व्हिडिओ : टीव्हीवर बातम्या देणारा हा जिवंत व्यक्ती नाही, तर...

आपल्या आयुष्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा हा एक नवा अध्याय

Updated: Nov 10, 2018, 02:36 PM IST
व्हिडिओ : टीव्हीवर बातम्या देणारा हा जिवंत व्यक्ती नाही, तर...  title=

नवी दिल्ली : तुम्हीही टीव्ही अँकर बनण्याच्या प्रयत्नात तुम्हीही असाल तर ही बातमी जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. भारताचा शेजारी देश चीनची सरकारी न्यूज एजन्सी 'शिन्हुआ'नं एक आभासी न्यूज रीडर सादर केलाय. याला पाहून टीव्हीवर बातम्या देणारी आकृती जिवंत माणूस आहे की मशीन हे ओळखणंही तुम्हाला कठिण होईल. 

कंपनीनं प्रेक्षकांसमोर गुरुवारी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित एक आभासी न्यूज अँकर सादर केलाय. हा आर्टिफिशियल इंटेलिजेन्स टेक्नॉलॉजी काम करतो.

हा अँकर एखाद्या व्यक्तीप्रमाणे स्क्रीनवर दिसणाऱ्या बातम्या वाचूी शकतो. आपल्या आयुष्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा हा एक नवा अध्याय असल्याचं मानलं जातंय. 

इंग्रजीत बोलणारा हा न्यूज रीडर आपला पहिला रिपोर्ट सादर करताना म्हणताना दिसतो 'हॅलो, तुम्ही पाहताय इंग्रजी न्यूज कार्यक्रम...मी तुम्हाला सूचना देण्यासाठी काम करत राहील. कारण माझ्यासमोर सलग शब्द टाईप होत राहतील. मी तुमच्यासमोर बातम्या नव्या ढंगात सादर करण्याचा एक वेगळा अनुभव घेऊन येईल'.

शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, हा व्हर्च्युअल न्यूज अँकर त्यांच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया चॅनलसाठी २४ तास काम करू शकतो. याचा खर्चही जास्त नाही आणि वेळोवेळी ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी याचा चांगला वापर होऊ शकतो.