जगाच्या नकाशावर अस्तित्वात येणार नवा देश

जगाच्या नकाशावर एक नवा देश अस्तित्वावर येऊ पाहात आहे. स्पेनमधला अत्यंत सधन म्हणून ओळखला जाणारा कॅटोलिना प्रांतातील नागरिकांनी देशापासून स्वतंत्र होण्याच्या बाजूनं कौल दिला.

Updated: Oct 10, 2017, 11:24 AM IST
जगाच्या नकाशावर अस्तित्वात येणार नवा देश title=

मुंबई : जगाच्या नकाशावर एक नवा देश अस्तित्वावर येऊ पाहात आहे. स्पेनमधला अत्यंत सधन म्हणून ओळखला जाणारा कॅटोलिना प्रांतातील नागरिकांनी देशापासून स्वतंत्र होण्याच्या बाजूनं कौल दिला.

सोमवारी झालेल्या सार्वमतातमध्ये 90 टक्के जनतेनं स्वतंत्र कॅटोलिनाच्या बाजूनं मतं दिलं आहे. १८८१ पासून कॅटोलिना प्रांताच्या स्वातंत्र्याचा लढा सुरु आहे. तेव्हापासून अनेकदा हा प्रांत माद्रिदच्या सत्ताकेंद्रापासून दूर होण्यासाठी लढतोय. पण स्पेनच्या प्रस्थापित राजकारण्यांनी एकमतानं या लढ्याला विरोध केला आहे. स्पेनच्या विभाजनाला फ्रान्स आणि जर्मनीही विरोध केलाय. त्यामुळे कॅटोलिनाच्या विभाजनाचे समर्थक नेते जगात एकटे पडू लागले आहेत. त्यातच सार्वमताचा निकाल आल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.

कॅटोलिनाबद्धल आपल्याला माहिती आहे का?

कॅटोलिना हा स्पेनमधील अत्यंत सधन भाग मानला जातो. या भागाला एक हजार वर्षाहूनही जुना असा स्वतंत्र इतिसाह आहे. स्पेनंमध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धापूर्वीच या परिसराला स्वातंत्र्य मिळाले होते. १९३९ ते १९७५  या कालावधीत जनरल फ्रान्सिस्को फ्रॅंको यांच्या नोतृत्वाखाली कॅटोलिनाला मिळालेले स्वांतंत्र्य नष्ट करण्यात आले. दरम्यान, फ्रॅंको यांचे निधन झाले. तेव्हा कॅटोलिनातील राष्ट्रवादाने पुन्हा जन्म घेतला. या राष्ट्रवादाला स्थानिकांकडून दिवसेंदिवस अधिक प्रतिसाद मिळत गेला. अखेर उत्तर पूर्व भागाला पुन्हा स्वातंत्र्य द्यावे लागले.१९७८ मध्ये संविधानाला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, २००६ मध्ये एका अधिनियमाच्या अधारे कॅटोलिनाला आखणी ताकद देण्यात आली. त्यामुळे कॅटोलिना आर्थिक दबदबा अधिकच वाढला. त्यामुळे कॅटोलिनाने स्वतंत्र देश अशी आपली ओळख निर्माण केली. मात्र, कॅटोलिना हा उत्साह फार काळ टिकू शकला नाही. कारण स्पेनच्या न्यायालयाने २०१० मध्ये पुन्हा एकदा कॅटोलिनाची सर्व ताकद काढून घेतली. तेव्हापासून स्पेनच्या सरकारवर कॅटोलिना प्रशासन नाराज आहे.
दरम्यान, आर्थिक मंदी आणि सार्वजनीक खर्च यांच्यातील तफावतीमुळे कॅटोलिनातील नागरिकांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची हाक दिली. त्यानंतर अनेकदा जनमत घेण्यात आले. दरम्यान, सोमवारी घेण्यात आलेल्या जनमतात कॅटोलिनाच्या बाजूने कौल मिळाला आहे. आता पुढे काय होणार याबाबत उत्सुकता आहे.