२३ वर्षानंतर कळलं 'तो' गुन्हेगार नाही; न्यायाधीशांनीच मागितली माफी

न केलेल्या गुन्हासाठी त्याने तब्बल 23 वर्ष तुरुंगात घालवली...

Updated: Jun 8, 2020, 07:05 PM IST
२३ वर्षानंतर कळलं 'तो' गुन्हेगार नाही; न्यायाधीशांनीच मागितली माफी title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : लैंगिक छळ आणि खून प्रकरणात एका व्यक्तीने आपल्या आयुष्यातील मौल्यवान 23 वर्षे तुरुंगात घालवली. मात्र या खटल्याची कोर्टात सुनावणी झाल्यानंतर आरोपी ठरवण्यात आलेला व्यक्ती निर्दोष ठरला आहे. त्यानंतर आता त्याला सोडण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण अमेरिकेतील आहे. एका व्यक्तीवर, चार वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आणि हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

मात्र आता खटल्यादरम्यान, 55 वर्षीय व्यक्ती त्या गुन्ह्यासाठी न्यायाधीशांना दोषी आढळली नसल्याचं समोर आलं. व्यक्ती दोषी नसल्याच्या निर्णयानंतर, न्यायाधिशांनीच दोषी ठरवण्यात आलेल्या त्या व्यक्तीची माफी मागितली. माफी मागत न्यायाधिशांनी म्हटलं की, निकाल येण्यास इतका काळ लागला याचा मला खेद आहे. तुम्ही निर्दोष आहात.

बारबरा जीन ही मुलगी तिच्या घरापासून जवळपास 300 मीटर दूर, त्यांच्या शेजाऱ्यांना मृतावस्थेत आढळली. तिच्या डोक्यावर जखमा होत्या आणि तिला कचऱ्याच्या पिशवीत ठेवण्यात आलं होतं. या घटनेला चार वर्ष उलटल्यानंतर हत्या आणि लैंगिक छळाप्रकरणी ऑग्रोड यांना अटक करण्यात आली. 1996 मध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर फिलाडेल्फियामध्ये न्यायाधिशांनी मागील सर्व निष्कर्ष रद्द करत, जे पुरावे समोर आले आहेत, त्यातून ऑग्रोड हे निर्दोष ठरत आहेत, असं सांगितलं.

चीनकडून भारताच्या सीमेजवळ हजारो सैनिक आणि रणगाडे तैनात

पाकिस्तानच्या 'या' माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण

 

याप्रकरणी काही वकिलांनी मुलीचा मृत्यू श्वास रोखल्यामुळे झाल्याचा दावा केला होता. ऑग्रोडचा कबूली जबाब जबरदस्ती घेतला गेल्याचंही सांगितलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनास्थळी अ‍ॅग्रॉडच्या उपस्थितीशी बरेच पुरावे जुळत नसल्याचाही दावा करण्यात आला होता. आता त्याला या आरोपातून मुक्त करण्यात आलं. मात्र न केलेल्या गुन्हासाठी त्याला तब्बल 23 वर्ष तुरुंगात घालवावी लागली हे दुर्दैव.

'भारतात ७ हजार कोटींची गुंतवणूक, चीनी वस्तूंवर बहिष्कार अशक्य'