वॉशिंग्टन : जो बायडेन (Joe Biden) यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव केला आहे. ते अमेरिकेचे ४६ चे राष्ट्राध्यक्ष ((American presidency) झाले आहेत. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक (US election 2020 ) निकालाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. बायडेन यांना २८४ तर ट्रम्प यांना २१४ इतकी मते मिळाली. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडेन विक्रमी मतांनी विजयी झालेत. बायडेन यांना सात कोटींहून जास्त मते मिळाली आहेत. बायडेन यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची निवड होणारेय. दरम्यान जो बायडेन यांच्यासमोर पुढच्या काळात काही आव्हान असणार आहेत.
अमेरिकेत कोरोना व्हायरसचा सर्वाधिक आकडा आहे त्यावर नियंत्रण आणणं हे महत्वाचं आव्हान जो बायडन यांच्यासमोर असणार आहे. कोरोना वायरसचा वाढता प्रादुर्भाव डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील जनतेच्या नाराजीचे प्रमुख कारण बनले आहे. जो बायडन यांनी देखील आपल्या प्रचारात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा उल्लेख केला. त्यामुळे त्यांना स्वत:ला सिद्ध करावे लागेल.
अमेरिकेत सर्वाधिक बेरोजगारी आहे. कोरोना संकटकाळात अमेरिकेत मोठ्या संख्येने नागरिक बेरोजगार झाले. एका रिपोर्टनुसार एप्रिलमध्ये ६६ लाख अमेरिकन्सनी बेरोजगारी भत्ता मिळावा यासाठी अर्ज केला. अमेरिकेच्या लेबर डिपार्टमेंटने हा आकडा जाहीर केलाय. यांना रोजगार देणं हे बायडेन यांच्यासमोर मोठं आव्हान असेल. ते बेरोजागारी काय उपाययोजना आखणार हे पाहणे महत्वाचे आहे.
रिपब्लीकन पार्टीचे लक्ष्य देशाची आर्थिक प्रगती करणं हे राहीलंय. पण सत्तांतर झाल्यानंतर बायडन हे कितपत संभाळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. हे बायडन यांच्यासाठी महत्वाचं आव्हान असेल. देशाची अर्थव्यवस्था ढासळल्यानेच ट्रम्प यांनी वारंवार लॉकडाऊन हटवले होते.
फ्रान्स, ऑस्ट्रीयानंतर अमेरिका दहशतवादाविरोधात कोणती कारवाई करणार ? हा प्रश्न भविष्यात जो बायडेन यांच्यासमोर असेल. अमेरिकेला कट्टरतावादापासून वाचवणं हे आव्हान बायडेन यांच्यासमोर असेल.
चीनच्या अतिक्रमण आणि विस्तारवादाविरुद्ध बायडेन यांची भूमिका पाहावी लागणार आहे. ट्रम्प हे चीनसमोर नेहमीच आक्रमक राहीले आहेत. सध्या चीन आणि अमेरिकेचे संबंध चांगले नाहीत. बायडेन यावर कसा विचार करतात याकडे साऱ्यांचे ल राहील.
चीनसोबत सुरु असलेले ट्रेड वॉर बायडेन थांबवतील ? की त्यांची भूमिका देखील कठोरच राहील ? आणि ते चीनला उघडपणे विरोध करतील हे पाहणं महत्वाचं आहे. चीनचा विस्तारवाद रोखणं हे बायडेन यांच्यासमोरील मोठं आव्हान आहे. चीनचे अतिक्रमण करणारे रुप अमेरिकेसोबतच जगासाठी चिंतेचा विषय बनलंय.