बगदाद : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष इरेला पेटला आहे. अमेरिकेने इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल (IRGC) कासीम सुलेमानी इराकची राजधानी बगदाद येथे मारले. त्यांच्या अंत्ययात्रेला जनसागर लोटला होता तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर स्वत:चे वर्चस्व राखण्याच्या हेतूने इराण लष्कर प्रमुखास ठार करण्याचा निर्णय घेतल्याचा ठपका ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात येत आहे.
इराणचा कमांडर कासीन सुलेमानीच्या हत्येनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. युद्ध शक्तींवर निर्बंध लादण्याबाबत अमेरिकेतल्या संसदेत मतदान होणार आहे. याच आठवड्यात हे मतदान घेतलं जाईल. प्रतिनिधी सभेच्या अध्यक्ष डेमोक्रॅटिक पार्टीच्या नॅन्सी पेलोसी यांनी याबाबत घोषणा केली आहे. याबाबतचा प्रस्ताव उच्च सदनाच्या सिनेटर टीम केनसारखाच असेल. या प्रस्तावाला संसदेत बहुमत असलेल्या प्रतिनिधी सभेकडून मंजुरी मिळू शकते.
कासीम सुलेमानी यांचा ताफा बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठजण ठार झाले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन लष्कराने इराणचे टॉप कमांडर मेजर कासेम सुलेमानी यांना ठार केलं आहे. तेहराच्या रस्त्यांवर कासिम सुलेमानींच्या अंत्ययात्रेसाठी जनसागर लोटला होता. यावेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष अयातुल्ला अली खामनेआई यांचे डोळे पाणावले. त्यांनी ताबुतावर ओठ टेकवून सुलेमानी यांना अखेरचा निरोप दिला. आता अमेरिकेचे वाईट दिवस सुरु असं वक्तव्य यावेळी सुलेमानी यांच्या मुलीनं केले आहे. नागरिकांना अमेरिका आणि इस्त्रायकडून बदला घेण्याची मागणी केली आहे.