Flood in America : जोरदार वादळ आणि पुरामुळे हाहाकार, परिस्थिती हाताबाहेर

 High winds and flood in America : कॅलिफोर्नियामध्ये आलेल्या पुरामुळे अमेरिकेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संपूर्ण शहर पुराच्या पाण्यात बुडालेल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Updated: Jan 12, 2023, 09:30 AM IST
Flood in America : जोरदार वादळ आणि पुरामुळे हाहाकार, परिस्थिती हाताबाहेर title=

America flood : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये (California) भयंकर वादळामुळे राज्यात मुसळधार पाऊस झाला. (Rain in America ) जोरदार वारे आणि पुरामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला. पुरामुळे परिस्थिती भयंकर झाली आहे. (America storm) शहर पाण्याखाली गेल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. एक लाखांपेक्षा जास्त लोकांच्या घरांची बत्ती गुल झाली आहे. त्यामुळे अनेकांना अंधारात राहावे लागले आहे. तर अनेक लोकांना आपली घरे सोडून दुसऱ्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला आहे. संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने काही भागात पुरामुळे चिखल साचला होता. 

संपूर्ण शहर पुराच्या पाण्याखाली गेले

कॅलिफोर्नियामध्ये आलेल्या पुरामुळे अमेरिकेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संपूर्ण शहर पुराच्या पाण्यात बुडालेल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा भीषण वादळ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीबरोबरच पुराचा कहर यामुळे लोक दुहेरी संकटात सापडले आहेत.  पुरात एक लहान मुलाग वाहून गेलाय. त्याचबरोबर लाखो लोकांना पुराचा इशारा देताना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 50 हजार लोकांनी त्यांची घरे सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत. मुसळधार पाऊस, वीज पडणे आणि मातीची धूप यामुळे 1.1 लाख लोकांच्या घरांची बत्ती गुल झाली आहे. घरे आणि व्यावसायिक केंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

वादळाचा परिणाम दक्षिण कॅलिफोर्नियाच्या पर्वतीय प्रदेशात 

वादळ तसेच पूर आणि पावसाच्या संकटाच्या वेळी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजम यांनी कॅपिटोला शहरातील सांताक्रूझ बीचला भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, डिसेंबर महिन्यापासून सुरु झालेल्या वादळाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 17 जणांचा बळी गेला आहे. गेल्या आठवड्यात पुराच्या कहरामुळे संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले होते.

कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर यांनी सांगितले की, आताची परिस्थिती अतिशय गंभीर आणि भयावह आहेत.' सोमवारपासून सुरु झालेल्या वादळाचे परिणाम दक्षिण कॅलिफोर्नियाच्या पर्वतीय प्रदेशात दिसून आले, जेथे दीड फूट (45 सेमी) पेक्षा जास्त पाऊस पडला. पूरस्थिती असताना कडाक्याच्या थंडीमुळे लोकही चिंतेत आहेत. सिएरा नेवाडा स्की रिसॉर्ट येथे पाच फुटांपेक्षा जास्त बर्फ जमा झाले आहे.

वादळाने झाडे कोसळून गाडयांचे मोठे नुकसान

वादळामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले. ट्रक आणि मोटारसायकलवर झाडे कोसळ्याने काहींचा मृ्त्यू झाला. व्हिसलियाजवळ सॅन जोक्विन व्हॅलीमध्ये महामार्ग 99 वर झाड पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. वादळ आणि पुरामुळे डोंगरातून माती आणि मोठे दगड कोसळत आहेत. दरड कोसळल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. पुरामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते. पुराच्या पाण्याच्या प्रवाहात अनेक घरे वाहून गेली आहेत, अशी माहिती कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल टीमने दिली.