अमेरिकेने जाहीर केली ५० श्रेष्ठ नेत्यांची यादी

राजकारणात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नेत्याची यादी अमेरिकेने तयार केली आहे. या यादीत पाच भारतीय नेत्यांची देखील वर्णी लागत आहे. यात अमेरिकेची राजदूत निक्की हेली, सीमा वर्मा, वकील  नील कत्याल, अर्थशास्त्री अर्पणा माथुर आणि वकील नियोमी राव यांचा समावेश आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 6, 2017, 05:10 PM IST
अमेरिकेने जाहीर केली ५० श्रेष्ठ नेत्यांची यादी  title=

वॉशिंग्टन : राजकारणात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नेत्याची यादी अमेरिकेने तयार केली आहे. या यादीत पाच भारतीय नेत्यांची देखील वर्णी लागत आहे. यात अमेरिकेची राजदूत निक्की हेली, सीमा वर्मा, वकील  नील कत्याल, अर्थशास्त्री अर्पणा माथुर आणि वकील नियोमी राव यांचा समावेश आहे. 

मॅगझिनच्या रिपोर्टनुसार निक्की हेली २२ व्या क्रमांकावर तर सीमा २६ व्या क्रमांकावर आहे. अर्थशास्त्री अर्पणा या ३२ व्य क्रमांकावर तर नील कत्याल ४० व्या क्रमांकावर आहे.  नियोमी राव यांनी या यादीत ४२ वे स्थान मिळवले आहे. 

व्हाईट हाऊसचे प्रमुख स्टीव बेनन हे यात अव्वल स्थानावर आहेत. तर अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेचे स्पीकर यांनी शेवटचे स्थान मिळवले आहे.