Alien : एलियन्सबद्दल तुम्हा-आम्हाला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. एलियन्सच्या अस्तित्वावरून संशोधकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मात्र, एलियनच्या अस्तित्वाचा कोणताही ठाम पुरावा अद्याप कोणी देऊ शकलेले नाही. अनेक कथा तसेच चित्रपटांमध्ये एलियनचे काल्पनिक पात्र दाखवले जाते. यामध्ये एलियन हिरव्या रंगाचे दाखवले जातात. प्रत्यक्षात मात्र, एलियन हिरव्या रंगाचे नाहीत अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. एलियनचा खरा रंग मानवासाठी खूपच धोकादायक असा दावा हे संशोधन करणाऱ्या संशोधकांनी केला आहे.
कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एलियनचा रंग कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी एक संशोधन केले. यासाठी एलियन वनस्पतींची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया समजून घेण्यात आली. याकरिता एलियन वनस्पतींवर एक प्रयोग करण्यात आला. एलियन वनस्पतींना इन्फ्रारेड रेडिएशनच्या संपर्कात आणले गेला. या प्रयोगादरम्यान एलियन वनस्पतींचा रंग बदलला. अशा प्रकारचे बदल हे फोटोट्रॉफिक ॲनोक्सीजेनिक बॅक्टेरिया आणि फोटोहेटेरोट्रॉफिक बॅक्टेरियामुळे होतात. बॅक्टेरिया आणि फोटोहेटेरोट्रॉफिक बॅक्टेरियामुळे प्रकाश पडल्यावर एलियन वनस्पतींची रंग बदलतो.
युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरी एक्स्ट्रिमली लार्ज टेलिस्कोपने देखील एक विशेष प्रयोग केला. अवकाशात जिथे सूर्यप्रकाश पडला की रंग बदलतो अशा ठिकाणांचे युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरी एक्स्ट्रिमली लार्ज टेलिस्कोपने सलोख निरीक्षण केले. या प्रयोगाचा अहवाल रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या मासिक नोटिसमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. कॉर्नेल विद्यापीठातील पीएचडीची विद्यार्थिनी लिझिया फोन्सेन्का कोएल्हो यांनी या प्रयोगाबाबत अधिक माहिती दिली. जांभळ्या रंगाचे जीवाणू विविध परिस्थितीत जगू शकतात. हे असे जीवाणू आहेत, जे कोणत्याही प्रकारच्या ग्रहावर राहू शकतात असे निरीक्षणादरम्यान आढळून आले.
एलियन जांभळ्या रंगाचे?
या संशोधनादरम्यान एलियन हे जांभळ्या रंगाचे असू शकतात असा देखील दावा केला जात आहे. हा दावा सिद्ध करण्यासाठी अनेक वनस्पतींचे निरीक्षण करण्यात आले. यासाठी जांभळ्या सल्फर आणि जांभळ्या सल्फर नसलेल्या बॅक्टेरियाचे 20 नमुने घेतले गेले. हे हायड्रोथर्मल व्हेंट्स आणि तलावांमधून जमा केले गेले. अशा प्रकारचे जीवाणू कमी उर्जेच्या लाल अवरक्त प्रकाशाने प्रकाशसंश्लेषण पूर्ण करतात. यासाठी पृथ्वीच्या बदलांचा देखील अभ्यास करण्यात आला. पृथ्वी देखील जांभळ्या रंगाची होती. 2022 मध्ये, मेरीलँड विद्यापीठाने एक संशोदन केले. सूर्यप्रकाशात मुख्यतः निळा आणि हिरवा स्पेक्ट्रम असतो. पण क्लोरोफिलच्या आधी रेटिनल नावाचा प्रकाश संवेदनशील रेणू पृथ्वीवर दिसला. हिरवा रंग लाल आणि वायलेट रंगांत प्रतिबिंबित झासा. मानवी डोळ्यांना हा हिरवा रंग जांभळ्या रंगात दिसला.