सुपर अर्थवर असू शकतात एलियन - शास्त्रज्ञांचा दावा

एलियन ही गोष्ट आतापर्यंत आपण फक्त सिनेमातून आणि जगात इतर काही ठिकाणी पाहिलेल्या स्पेसशिप पाहिल्याचा दावा देखील केला गेला आहे. पण एलियनच्या अस्तित्वाबाबत कोणतेही ठोस पुरावे अजून मिळालेले नाहीत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 7, 2017, 10:04 AM IST
सुपर अर्थवर असू शकतात एलियन - शास्त्रज्ञांचा दावा title=

नवी दिल्ली : एलियन ही गोष्ट आतापर्यंत आपण फक्त सिनेमातून आणि जगात इतर काही ठिकाणी पाहिलेल्या स्पेसशिप पाहिल्याचा दावा देखील केला गेला आहे. पण एलियनच्या अस्तित्वाबाबत कोणतेही ठोस पुरावे अजून मिळालेले नाहीत.

पृथ्वीसारखा ग्रह

शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, पृथ्वीपासून 111 प्रकाश वर्ष दूर स्थित 'के2-18बी' ग्रहावर एलियन असण्याची शक्यता आहे. हा ग्रह पृथ्वीसारखा दिसतो पण त्याचा आकार पृथ्वीपेक्षा अनेक पट्टीने जास्त आहे. त्यामुळे त्याला सुपर अर्थ देखील म्हणतात. टोरंटो युनिव्हर्सिटी, कॅनेडियन शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, के2-18 चा भार आणि घनत्व या बाबत माहिती शोधण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला.

आणखी एका ग्रहाचा शोध

शोधदरम्यान युरोपियन दक्षिणेकडील वेधशाळेने शोधलेल्या माहितीचा अभ्यास केला गेला. या काळात वैज्ञानिकांनी के2-18 नामक ग्रह आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या आणखी एका ग्रहाचा देखील शोध लावला आहे.

राहण्यायोग्य वातावरण

2015 मध्ये के2-18 चा शोध लागल्यानंतर असं समोर आलं की, ग्रह त्याच्या ताऱ्यापासून तितक्या अंतरावर आहे जितक्या अंतरावर तेथे राहण्यासाठी योग्य वातावरण लागतं. येथे पाण्याचं अस्तित्व असण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे तेथे एलियनच्या अस्तित्वाची सुद्धा शक्यता असल्याचं शास्त्रज्ञांनाचं म्हणणं आहे.