अजब गजब! महिलेने दिला जुळ्या मुलींना जन्म, पण वाढदिवसात एक वर्षाचं अंतर

जुळ्या मुलींच्या जन्माची अजब-गजब घटना, महिलेने फेसबूक पोस्ट (Facebook Post) करत सांगितली आपली कहाणी

Updated: Jan 19, 2023, 01:34 PM IST
अजब गजब! महिलेने दिला जुळ्या मुलींना जन्म, पण वाढदिवसात एक वर्षाचं अंतर title=

Ajab Gajab : तज्ज्ञांच्या एका अहवालानुसार 40 प्रसुतींमध्ये एका जुळ्याचा मुलाचा जन्म होतो. असं म्हणतात की जगभरात दरवर्षी तब्बल 16 लाख जुळी बाळं जन्मतात. उशिराने गर्भधारणा आणि गर्भधारणेसाठी (pregnancy) IVF सारख्या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वाढता वापर, यामुळे जुळी अपत्यं जन्माला येण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसं पाहिलं तर जुळी मुलं होणं, हे सामान्य मानलं जातं. पण एका जुळ्या मुलींच्या (Twin Girls) जन्माची अजब-गजब घटना समोर आली आहे. कारण या मुली जन्माला जुळ्या म्हणून आल्या पण दोघींच्या वाढदिवसात (BirthDay) तब्बल एका वर्षाचं अंतर आहे. 

अमेरिकेतल्या (America) टेक्सासमध्ये (Texas) राहणआरी कली जो फ्लिवेलेन नावाच्या महिलेने फेसबूक पोस्ट (Facebook Post) करत आपली कहाणी सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे. या महिलेचा पती क्लिफने आपल्या जुळ्या मुलींची नावंही ठेवली आहे. यापैकी एका मुलीचं नाव आहे एनी आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे एफी. 

जुळ्या मुलींच्या वाढदिवसात एका वर्षाचं अंतर
वास्तविक एक मुलीचा पाच मिनिटांनी जन्म झाला. एनी ही पाच मिनिटांनी मोठी तर एफी ही लहान आहे. एनीचा जन्म  31 डिसेंबर 2022 ला 11 वाजून 56 मिनिटांनी झाला. तर एफीचा जन्म 1 जानेवारी 2023 रोजी 12 वाजून 1 मिनिटांनी झाला. दोघींची प्रकृती उत्तम असून दोघींचं वजन साधारण 5.5 पाऊंड इतकं आहे. जुळ्या मुलींच्या जन्माने फ्लिवेलेन आणि क्लिफ प्रचंड खुश आहेत. 

जुळ्या मुलांचा दर
एका अभ्यासानुसार गेल्या तीन वर्षात जुळ्या मुलांचा जन्मदर वाढला आहे. अमेरिकेत जुळी जन्माला येण्याचं प्रमाण 71 टक्यांनी तर आशियात हेच प्रमाण 32 टक्क्यांनी वाढलं आहे. गेल्या काही काळात गर्भधारणेसाठी IVF, ICSI, कृत्रिम गर्भधारणा, ओव्हेरियन स्टिम्युलेशन यासारख्या प्रगत वैद्यक तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय. हेदेखील जुळ्यांचं प्रमाण वाढण्यामागचं एक मुख्य कारण आहे.

जुळ्या मुलांचं गाव
जगात एक असं शहर आहे जिथे जुळी मुलं जन्माला येण्याचा दर सर्वाधिक आहे. नायजेरियातील इग्बो-ओरा (Igbo-Ora)या शहराला जुळ्या मुलांची राजधानी म्हटलं जातं. इथे प्रत्येक हजार मुलांच्या जन्मात 158 जुळ्या मुलांचे जन्म होतात.