लंडन : प्रत्येक सामान्य माणसाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रांगेत उभं राहावं लागतं. परंतु लोकांना तासन तास रांगेत उभे राहणे कंटाळवाणे वाटते. ज्यामुळे लोकं रांगेत उभे राहाणे टाळतात. रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून बऱ्याचदा लोकं समोरच्याला पैसे देखील द्यायला तयार होतात. लोकांना बऱ्याचदा वाटतं की, उगाच रांगेत उभे राहून पैसे घालवण्यापेक्षा 2/4 रुपये गेलेल परवडतात पण ते रांगेत उभं राहणं नकोच. पण विचार करा की तुम्हाला यासाठी हजारो रुपये मिळाले तर? मग तुम्ही काय कराय? रांगेत उभे राहाल की नाही?
खरंतर लंडनमध्ये राहणाऱ्या माणसाचं काम आहे रांगेत उभं राहणं. असे करून तो दररोज 16 हजार रुपयांपर्यंत कमावतो.
लंडनच्या फुलहॅममध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव फ्रेडी बेकिट आहे. 31 वर्षीय फ्रेडीने आपल्या रोजगारासाठी अशी नोकरी निवडली आहे, ज्याबद्दल ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. गेली 3 वर्षे इतर लोकांसाठी रांगेत उभे राहून तो पैसे मिळत आहेत. फ्रेडीने हे काम आता आपला व्यवसाय बनवला आहे.
ज्यांना रांगेत उभे राहणे आवडत नाही त्यांच्यासाठी फ्रेडी हे ऑप्शन आहे, तर फ्रेडीजकडे हे एक कमाईचे साधन आहे. हे लोक फ्रेडीला रांगेत उभे राहण्यासाठी भाडं देतात.
समजा एखाद्या प्रसिद्ध गायकाचं कॉनसर्ट असेल, तर तेथे सगळ्यांना जायला आवडते. पण याचे तिकीट मिळवण्यासाठी लोकांना तासन तास रांगेत उभे राहावे लागते. ज्यामुळे हे लोकं फ्रेडीकडे ही जबाबदारी देतात आणि त्याला यासाठी पैसे देखील मोजतात.
फ्रेडीच्या म्हणण्यानुसार, 1 तास रांगेत उभे राहण्यासाठी त्याला 2 हजार रुपये फी मिळते. या कामातून तो दिवसाला 15 ते 16 हजार रुपये कमावतो, अशा परिस्थितीत तो एका महिन्यात भरपूर कमाई करतो.
जे लोकांसाठी अगदी सामान्य आहे, अशा गोष्टींना महत्व देत आणि आपल्या बुद्धीचा वापर करत जास्त मेहनत न करता फ्रेडी जास्त पैसे कमावत आहे.