पोटात दुखत असल्याने एअरहोस्टेस गेली टॉयलेटला,पण झालं अस की तिच्या पायाखालची जमीन सरकली

महिलेसोबत अस का घडलं असा प्रश्न सर्व महिला वर्गाला पडलाय, जाणून घ्या

Updated: Jul 21, 2022, 02:08 PM IST
पोटात दुखत असल्याने एअरहोस्टेस गेली टॉयलेटला,पण झालं अस की तिच्या पायाखालची जमीन सरकली  title=

मुंबई : एखादी स्त्री जेव्हा प्रग्नेट असते त्यावेळेस तिचे शरीर तिला अनेक संकेत देत असतात. मात्र या घटनेत काही वेगळचं झाल आहे. महिलेला बाळाला जन्म देईपर्यंत माहित नव्हत ती बाळाला जन्म देतेय. ज्यावेळेस ती टॉयलेटला गेली आणि तिच्यासोबत जे घडलं त्याने तिच्या पायाखालची जमीन सकरली.    

युकेची 22 वर्षीय ल्युसी जोन्स एक  प्रशिक्षणार्थी एअरहोस्टेस आहे. या ल्युसी दावा केला आहे की, शौचालयात जाताना मुलीचे दोन पाय बाहेर येताना दिसल्यावरच तिला तिच्या गरोदरपणाची माहिती मिळाली. विशेष म्हणजे या घटनेत, ती गर्भनिरोधक गोळ्या घेत होती मात्र तरीही ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी गर्भधारणा चाचणीही निगेटिव्ह आली होती.आणि काही दिवसांपूर्वी तिला एअरलाइन टेस्टमध्ये उड्डाणासाठी फिट घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या घटनेने तिला मोठा आश्चर्याचा धक्का बसलाय.

प्रेग्नेसी दरम्यान दारू पार्ट्या 
लुसी जोन्स सांगतात की, गेल्या महिन्यात जेव्हा एका मुलीला जन्म दिला तेव्हा तिला आश्चर्य वाटले. कारण तिच्यामध्ये गर्भधारणेची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. एवढेच नाही तर तिने गर्भनिरोधकांचाही वापर केला होता. लुसीच्या म्हणण्यानुसार, ती गरोदरपणात सुमारे 10-15 वेळा क्लबमध्ये गेली, दारू प्यायली, अनेक पार्ट्यांमध्ये सहभागी झाली असल्याचे ती सांगते. दोन निगेटीव्ह गर्भधारणा चाचण्या आणि वैद्यकीय चाचण्या असूनही, ल्युसी जोन्सला कल्पना नव्हती की ती लवकरच एका मुलीला जन्म देणार आहे.

एका वृत्तसंस्थेशी लुसी म्हणाली, 'मला टॉयलेटमध्ये मुलगी पाहिल्याशिवाय मी गरोदर आहे हे माहीतच नव्हते.मी बेडवर होते, अचानक पोटात दुखु लागले. मला टॉयलेटला जावं लागेल असं वाटलं. मी पटकन टॉयलेटमध्ये गेले आणि तिथे एका मुलीला जन्म दिला. यानंतर ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली, कारण मी घरी एकटीच होते.सध्या लुसीची बाळ मुलगी रुबी पूर्णपणे तंदुरुस्त आहे असे ती म्हणतेय.