चीन : चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोनाने आतापर्यंत हजारो निश्पाप जीवांचा बळी घेतला आहे. तर कोरोना नष्ट झाला नसताना अता चीनमध्ये आणखी एका व्हायरसने जन्म घेतला आहे. या व्हायरसमुळे चीनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. हंता व्हायरस (Hanta Virus) असं या नव्या विषाणूचं नाव आहे.
यूनान प्रांतात या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शाडोंग प्रांतातून परतताना बसमधेच त्याने आपले प्राण सोडले आहे. त्यामुळे बसमध्ये असलेल्या इतर ३२ प्रवाशांची चाचणी करण्यात येणार आहे. हंता व्हायरस हा कोरोना सारखा धोकादायक विषाणू नसल्यामुळे लोकांनी घाबरण्याचे काही कारण नाही.
उंदीर किंवा खारींच्या संपर्कात आल्याने हा व्हायरस पसरतो. उंदीर, खारीच्या विष्ठेला, मृतशरिराला हात लावला आणि त्यानंतर तोच हात नाक, डोळे, तोंडाला लागल्यास या व्हायरसचा संसर्ग होतो.
डोकेदुखी, ताप, अंगदुखी, पोटदुखी, उलट्या होणे, अतिसार ही हंता व्हायरसची प्रमुख लक्षणे आहेत. महत्त्वाचं म्हणजे
उपचार करण्यास उशीर झाला तर फुफ्फुसात पाणी होते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे वेळेत योग्य उपचार घेतल्यामुळे या व्हायरसचा संसर्ग रोकण्यासाठी चिनी लोकांना यश मिळेल.