अफगाणिस्तानाची स्वातंत्र्याकडे वाटचाल? 3 जिल्हे तालिबान्यांच्या ताब्यातून मुक्त

तालिबान्यांनी कंधार, हेरात सारख्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवला आहे आणि तालिबानचा झेंडा फडकवला आहे. 

Updated: Aug 23, 2021, 03:42 PM IST
अफगाणिस्तानाची स्वातंत्र्याकडे वाटचाल? 3 जिल्हे तालिबान्यांच्या ताब्यातून मुक्त title=

काबूल : तालिबान्यांना अफगाणिस्तानमध्ये वेगाने ताब्यात घेण्यात सुरू केली आहे. राजधानी काबूलसोबतच इतर भागांवर तालिबान्यांनी संपूर्ण ताबा मिळवला आहे. रविवारी तालिबानने बागलाण प्रांतातील बन्नू जिल्हा ताब्यात घेतला आहे. अतिरेकी संघटनेच्या सेनानींनी सांगितले की, सध्या जिल्ह्यात क्लिअरन्स सुरू आहे. तालिबानने गेल्या रविवारी काबूलवर कब्जा केला. तेव्हापासून मोठ्या संख्येने लोक देश सोडून पळून जात आहेत.

काबूलसह देशातील प्रमुख शहरे तालिबान्यांनी काबीज केली आहेत. तालिबान्यांनी कंधार, हेरात सारख्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवला आहे आणि तालिबानचा झेंडा फडकवला आहे. तालिबानच्या ताब्यात आल्यापासून या शहरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तालिबानने म्हटले आहे की, ते इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत ते आता राज्य करतील.

तथापि, लोकांना भीती आहे की, तालिबान्यांनी जर शरिया आणि इस्लामिक कायद्यानुसार देश चालवला, तर देशातील महिलांचे अधिकार कमी होऊ शकतात. हेच कारण आहे की, पाश्चिमात्य देशांसह संयुक्त राष्ट्र संघ अफगाणिस्तानातील महिलांच्या स्थितीबद्दल चिंतित आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, तालिबान आणि अफगाण सुरक्षा दलांमधील युद्धामुळे असंख्य लोक उपाशी आणि रोगराईला बळी पडले आहेत. डब्ल्यूएचओचे प्रवक्ते तारिक जसारेविक यांच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानच्या निम्म्या लोकसंख्येला मानवतावादी मदतीची नितांत गरज आहे. यामध्ये 40 लाख महिला आणि एक कोटी मुलांचा समावेश आहे.

प्रवक्त्याने म्हटले आहे की, सध्या देशात मानवी सेवांना योग्य प्रकारे हाताळण्यासाठी आरोग्य सेवा योग्यरित्या कार्य करणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या बहुतेक जिल्ह्यांना तेब्यात घेतल्यानंतर देखील शूर अफगाण लोकांनी अजूनही तालिबानपुढे हार मानलेली नाही. अफगाणिस्तानच्या माध्यमांनुसार, लोकांनी बंडखोर गटाविरुद्ध लढा सुरू केला आहे.

तालिबानविरोधी कमांडर अब्दुल हमीद ददगर यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या बागलाण (Baghlan) प्रांतातील तीन जिल्हे तालिबानच्या ताब्यातून मुक्त केले आहेत. ही घटना तालिबान आणि पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला असल्याचे सांगितले जात आहे.

परंतु पाकिस्तानचा पाठिंबा आणि शस्त्रांच्या मदतीने तालिबान अफगाणिस्तानचा बहुतांश भाग काबीज करण्यात यशस्वी झाला आहे