अफगाणिस्तानील भीषण परिस्थितीचे नवे पुरावे! काबुलवरून उड्डाण केलेल्या विमानाच्या चाकात सापडले मानवी अवशेष

काबूलमधून उड्डाण केल्यानंतर, हवाई दलाचे सी -17 ग्लोब मास्टर विमान कतारमध्ये उतरले.

Updated: Aug 18, 2021, 02:04 PM IST
अफगाणिस्तानील भीषण परिस्थितीचे नवे पुरावे! काबुलवरून उड्डाण केलेल्या विमानाच्या चाकात सापडले मानवी अवशेष title=

कतार : अफगाणिस्तानमधून आणखी एक भितीदायक बातमी समोर आली आहे. जी वाचल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. अमेरिकन हवाई दलाकडून एक बातमी सांगण्यात आली ज्याने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. खरंतर, सोमवारी अमेरिकेचं काबूलवरुन निघालेल्या विमानात आफगाणिस्तानाच्या नागरिंकांनी बसण्यासाठी आणि आपला जीव वाचवण्यासाठी खूप आटापिटा केला. परंतु सगळ्याच लोकांना वाचवणे शक्य झाले नाही.

काबूलमधून उड्डाण केल्यानंतर, हवाई दलाचे सी -17 ग्लोब मास्टर विमान कतारमध्ये उतरले, जिथे विमानाच्या चाकांवर मानवी शरीराचे अवशेष मिळाले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानचा ताबा झाल्यानंतर तेथील नागरिकांनी देश सोडणाऱ्यांच्या निर्णय घेतला आणि अमेरिकेच्या विमानातून जाण्यासाठी गर्दी केली. काबूल विमानतळावर अनेक दिवसांपासून गोंधळ आहे. लोकांना कोणत्याही किंमतीत देश सोडून जायचे आहे.

त्यावेळेला देखील हृदय पिळवटून टाकणारे प्रकरण समोर आले होते. कारण जेव्हा अमेरिकन विमानाने उड्डाण केले, तेव्हा काही लोकं विमानवरुन खाली पडताना दिसले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. 

अमेरिकेच्या हवाई दलाने म्हटले आहे की, ते काबुलवरून उड्डाण घेतलेल्या सी -17 विमानाच्या चाकावर त्यांना मानवी शरीराचे अवशेष सापडले आहे. हवाई दलाच्या निवेदनात म्हटले आहे की, रविवारी सी -17 ग्लोबमास्टर काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

या विमानातून काही जीवनावश्यक वस्तू विमानाद्वारे अफगाणिस्तानला पाठवण्यात आल्या. परंतु उपकरणे काढण्यापूर्वीच शेकडो अफगाणि लोकांनी विमानात प्रवेश केला. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहाताच पायलटने शक्य तितक्या लवकर विमान परत नेण्याचा निर्णय घेतला.

गेल्या दोन दिवसात काबूल विमानतळावर कमीतकमी 10 लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. खरंतर, देश सोडण्याच्या प्रयत्नादरम्यान, हजारो लोकांनी विमानात चढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विमानतळावरील उड्डाणांच्या उपलब्धतेबद्दल लोकांना चुकीची माहिती देण्यात आल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.