काबूल : अफगाणिस्तानात नव्या वर्षाचं सेलिब्रेशन सुरू असतानाच राजधानी काबुलमध्ये झालेल्या हल्ल्यानं देश हादरलाय.
एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आत्मघातकी हल्ल्यात जवळपास २६ जण मृत्यूमुखी पडल्याचं तर १८ जण जखमी झाल्याचं समजतंय. हा हल्ला राजधानी़तील एका शिया धार्मिक स्थळावर करण्यात आला. हल्लेखोर घटनास्थळी चालत आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय.
राजधानीत लोक पारसी वर्षांची सुट्टी एन्जॉय करत असतानाच हा दहशतवादी आत्मघातकी हल्ला करण्यात आला. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वहीद मजरोह यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं.
आत्तापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.