एक मच्छर जीवावर उठला; तरुण थेट ICU मध्ये दाखल, 30 वेळा करावं लागल ऑपरेशन

मच्छरने चावा घेतल्यामुळे हा व्यक्ती थेट   ICU मध्ये पोहोचला आहे. इतकचं नव्हे तर या व्यक्तीचे उपचारादरम्यान 30 वेळा ऑपरेशन देखील करण्यात आले. जर्मीनीमध्ये(Germany) राहणाऱ्या व्यक्तीसह हा प्रकार घडला आहे. 

Updated: Nov 27, 2022, 10:30 PM IST
एक मच्छर जीवावर उठला; तरुण थेट  ICU मध्ये दाखल, 30 वेळा करावं लागल ऑपरेशन  title=

Mosquito Bite : मच्छर चावल्याने(Mosquito Bite) डेंग्यू(Dengu) आणि मलेरियाची(Maleria) लागण होण्याचा धोका असतो. यामुळे सगळेच जण मच्छराचा चावा होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतात. मात्र, एका व्यक्तीला मच्छरने थेट मृत्यूच्या दारात पोहचवले आहे. मच्छरने चावा घेतल्यामुळे हा व्यक्ती थेट   ICU मध्ये पोहोचला आहे. इतकचं नव्हे तर या व्यक्तीचे उपचारादरम्यान 30 वेळा ऑपरेशन देखील करण्यात आले. जर्मीनीमध्ये(Germany) राहणाऱ्या व्यक्तीसह हा प्रकार घडला आहे. 

जगात आईसलँड आणि अंटार्क्टिका या दोन ठिकाणी अजीबात मच्छर सापडत नाहीत. तर, भारतात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होते. मच्छरामुळे भारतात विविध आजार फैलावत असल्याने सरकारमार्फत डासांची पैदास रोखण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जातात. जर्मीनीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला डासाने थेट रुग्णालयात पोहचवले आहे. 

सेबॅस्टियन रोत्शके असं या व्यक्तीचं नाव आहे. सेबॅस्टियन याला एशियन टायगर प्रजातीच्या डासाने चावा घेतला. यानंतर सेबॅस्टियनवर तब्बल 4 आठवडे उपचार सुरु होते. या दरम्यान त्याच्यावर एक-दोन नव्हे तर 30 वेळा शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.

एशियन टायगर प्रजातीचा हा डास अत्यंत विषारी असतो. हा डास चावल्यानंतर त्याच्या रक्तात डासांचे विष पसरले. यामुळे त्याच्या संपूर्ण शरीरात संसर्ग पसरला. यामुळे त्याच्या यकृतासह मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम झाला. सुरुवातीला सेबॅस्टियनच्या शरीरात फ्लूसारखी लक्षणे दिसू लागली, पण त्यानंतर तो सतत आजारी पडू लागला. यानंतर त्याच्या पायाला जखम झाली आणि ती जखम बळावली. यामुळे त्याच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. अजूनही सेबॅस्टियनच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झालेली नाही.