मुंबई : आता कुठे जग कोरोनातून बाहेर येत मोकळा श्वास घेत होतं. तोच कोरोना (Corona) नवा अवतार घेऊन पुन्हा आलाय. डेल्टा, डेल्टा प्लस, ओमिक्रॉननं थैमान घातल्यानंतर आता डेल्टा आणि ओमिक्रॉनची युती झालीय आणि कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा जन्म झालाय. याबाबत WHO नं आधीच सावध केलं होतं. (a new variant made up of delta and omicron who told how dangerous it is)
तुम्ही घरातून निघताना मास्क घालताय ना, तुम्ही लस घेतलीय ना, हे सगळे प्रश्न पुन्हा आवर्जून विचारण्याचं कारण म्हणजे कोरोना परत येण्याची भीती आहे. कारण आता ओमायक्रॉन आणि डेल्टा यांनी हातमिळवणी केली आहे.
डेल्टा आणि ओमिक्रॉनचा व्हेरियंट अतिशय वेगानं पसरण्याची भीती आहे. जानेवारी 2022 मध्ये फ्रान्समध्ये पहिल्यांदा हा व्हेरियंट सापडला. डेन्मार्क आणि नेदरलँडमध्येही हा व्हेरियंट सापडलाय.
हा व्हायरस किती धोकादायक आहे, याचा अभ्यास सुरू आहे. कोरोनाचे आणखीही नवनवे व्हेरियंट समोर येतील, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.
कोरोनानं चीनमध्ये पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली असतानाच डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या युतीनं नव्या संकटाची चाहूल दिली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातली ही लढाई संपलेली नाही. शत्रू लपंडाव खेळतोय. मास्क लावा, लस घ्या... सावध राहा.