घरात घुसून त्याने आधी महिलांचे पाय चोळले, नंतर त्यांना जाग येताच....; हादरवणाऱ्या घटनेनंतर एकच खळबळ

अमेरिकेतील एक अजब घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने घरांमध्ये घुसून महिलांचे पाय चोळले. महिलांना जाग येताच त्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलिसांनी फॉरेन्सिकच्या सहाय्याने आरोपीला अटक केली आहे   

शिवराज यादव | Updated: Aug 5, 2023, 04:44 PM IST
घरात घुसून त्याने आधी महिलांचे पाय चोळले, नंतर त्यांना जाग येताच....; हादरवणाऱ्या घटनेनंतर एकच खळबळ title=

अमेरिकेत एका व्यक्तीला घरात घुसखोरी करत महिला झोपेत असताना त्यांचे पाय चोळल्याप्रकरणी अटक केली आहे. नेवाडा येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अँथनी गोन्झेल्स असं या 26 वर्षीय आरोपीचं नाव आहे. नेवाडा येथे त्याने काही घरांमध्ये घुसखोरी केली आणि महिला झोपेत असताना त्यांचे पाय चोळत बसला. दरम्यान आरोपीने याआधीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत अशी माहिती शेरीफ विभागाने दिली असल्याचं वृत्त सीबीएस न्यूजने दिलं आहे.

अँथनीने कथितरित्या 1 ते 3 जुलै दरम्यान सकाळी दरवाजा उघडा असणाऱ्या दोन घरांमध्ये प्रवेश केला होता अशी माहिती शेरीफच्या विभागाने फेसबुकवर दिली आहे. दोन्ही महिला बेडवर झोपलेल्या असतानाच आरोपी त्यांच्या पायाजवळ उभा राहिला आणि पाय चोळले असा आरोप आहे. 

आरोपीने पायाला हात लावल्यानंतर महिलांना जाग आली आणि त्यांनी त्याच्यावर ओरडण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने तेथून पळ काढला होता. महिलांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांना आरोपीची ओळख पटवत त्याला अटक केली आहे. फॉरेन्सिकच्या सहाय्याने आरोपीची ओळख पटवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 1 ऑगस्टला कॅलिफोर्नियातून आरोपीला अटक करण्यात आली. 

"एकदा घरात शिरल्यानंतर आरोपी पलंगाच्या पायथ्याशी उभा राहिला आणि दोन वेगवेगळ्या महिलांचे पाय घासले. यानंतर या दोन्ही महिलांना जागी आली. एक अनोळखी व्यक्ती आपल्या पायाशी बसलेली पाहून त्या प्रचंड घाबरल्या होत्या. दरम्यान त्यांनी त्याच्यावर ओरडण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला," अशी माहिती सोशल मीडिया पोस्टमध्ये देण्यात आली आहे. 

"गोन्झालेसचं डग्लस काउंटी, नेवाडा येथे परत प्रत्यार्पण करेपर्यंत 50 हजार डॉलर्सच्या जामिनासह फरारी वॉरंटवर मर्सिड काउंटी तुरुंगात ठेवण्यात येणार आहे," अशी माहितीही देण्यात आली आहे. 

आरोपीने याआधीही असे काही गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. काही घटनांमध्ये त्याने महिलांच्या शूजची चोरी, अतिक्रमण आणि लैंगिक सुख अशा गोष्टी केल्याची शंका असल्याचं शेरीफ विभागाने सांगितलं आहे.

"माझ्या तपास अधिकाऱ्यांनी आरोपीची ओळख पटवली आणि आणि अटक करण्यात सक्षम झाले याचा मला आनंद आहे," असं डग्लस काउंटी शेरीफ डॅन कव्हरले यांनी एका निवेदनात म्हटले आहे. 'या प्रकारचे गुन्हे विशेषतः समुदायासाठी चिंताजनक आहेत आणि अटक करण्यात सक्षम झाल्यामुळे पीडितांना आणि समुदायाला पुन्हा सुरक्षित वाटू शकते,' असंही सांगितलं.