मृत्यूनंतर नेमकं काय होतं? 7 मिनिटांसाठी मृत झालेल्या व्यक्तीने सांगितला अनुभव, म्हणाला 'त्या पलीकडे....'

मृत्यूनंतर नेमकं काय होतं याची प्रत्येकाला उत्सुकता असते. मृत्यूनंतर खरंच स्वर्ग, नरक असं काही असतं का अशी शंकाही असते. दरम्यान नुकतंच एका व्यक्तीने आपला 7 मिनिटांसाठी मृत्यू झाला होता, असा दावा केला असून त्यानंतर काय झालं हे सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 11, 2024, 08:11 PM IST
मृत्यूनंतर नेमकं काय होतं? 7 मिनिटांसाठी मृत झालेल्या व्यक्तीने सांगितला अनुभव, म्हणाला 'त्या पलीकडे....' title=

जन्मानंतर मृत्यू हा प्रत्येकासाठी अटळ आहे. जो जन्माला आला आहे, त्याचा मृत्यू होणार हे निश्चितच आहे. पण पण मृत्यूनंतर नेमकं काय होतं याची प्रत्येकाला उत्सुकता असते. मृत्यूनंतर खरंच स्वर्ग, नरक असं काही असतं का अशी शंकाही असते. दरम्यान नुकतंच एका व्यक्तीने आपला 7 मिनिटांसाठी मृत्यू झाला होता, असा दावा केला असून त्यानंतर काय झालं हे सांगितलं आहे. 40 वर्षांचे एस्ट्रोफिजिक्समधील पीएचडी व्यक्तीने रेडिटवर आपला हा अनुभव शेअर केला आहे. मात्र यामध्ये आता सत्यता किती आहे हा पडताळण्याचा विषय आहे. पण त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

सोशल मीडिया एक असं ठिकाण आहे जिथे प्रत्येकजण आपला अनुभव शेअर करत नवनवे दावे करत असतं. काहीजण एलियन्स पाहिल्याचा, मृत्यूनंतरचं जग पाहिल्याचा दावा करत असतात. आता या सत्यता किती आहे याबाबत साशंकता असली, तरी ते तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतात. 

असाच मृत्यूनंतरचं जग पाहिल्याचं दावा करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं आहे की, मला श्वास घेण्यात त्रास होत असल्याने मार्च महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फुफ्फुसात रक्तस्त्राव झाल्यानंतर मला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनी सांगितलं की, माझ्या हृदयाचे ठोके बंद झाले होते. माझे हृदय पुन्हा सुरु होण्यास डॉक्टरांना 7 मिनिटं लागली. त्यादरम्यान, माझ्या मेंदूला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे स्ट्रोक आला. ही सात मिनिटे अशी होती की आयुष्यभर माझ्या नजरेत राहिली. मी सात मिनिटांसाठी मेलो होतो. 

पुढे त्याने दावा केलाय की, "यादरम्यान मी 3 अंडाकृती आकृतींच्या मालिका पाहिली. मी एका अंधाऱ्या जागेत लटकलेलो होतो. पहिल्या आकृतीत मला आतल्या आणि बाहरेच्या बाजूला डोंगल, धबधबे, जंगल आणि ढग दिसले".

पुढे तो म्हणाला की, आधीचे गोळे टरफले सुंदर होते, पण नंतर त्यांचा रंग पिवळा होऊ लागल्याने ते खराब दिसू लागले. तो क्षीण झाला आणि त्याच्या जागी दुसरा गोल आला, जो लोखंडाच्या गरम अंगठीसारखा होता. चो इतका गरम होता की लोखंडाचे तुकडे हळूहळू तुटत होते. मी लोखंडाचा वास घेऊ शकत होतो. अचानक दृश्य उजळले आणि एक तिसरा गोल दिसू लागला, जो फिकट गुलाबी आणि निळ्या रंगाच्या सुंदर ढगांनी झाकलेला होता, जसे की सर्वात सुंदर सूर्योदय किंवा सूर्यास्त.

पुढे त्याने सांगितलं की, "ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मला कार्डियक अरेस्ट आला होता. जेव्हा माझं ह्रदय पुन्हा धडधडू लागलं तेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा माझ्या मनात हे दृश्य छापलेलं होतं. जेव्हा काही दिवसांनी मला कार्डियक अरेस्ट आणि स्ट्रोकबद्दल सांगण्यात आलं तेव्हा मला सगळं समजू लागलं. मला वाटलं मी स्वप्न पाहत होतो. पण मी मेलो होतो आणि तेव्हा ती सर्वात चांगली घटना होती".