Mumbai Kamathipura Redevelopment :मुंबईतील कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्पाबाबत महत्वाचा निर्णय झाला आहे. 35 एकर जागेवर म्हाडाचा मेगा प्रोजेक्ट असणार आहे. 8 हजार कुटुंबांना नव घर मिळणार आहे.
मुंबईतील म्हाडा मुख्यालयात काल कामाठीपुरा पुनर्वसन समितीची बैठक झाली. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली. या बैठकीला क्रेडाईचे पदाधिकारी, सल्लागार, आमदार अमिन पटेल, म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते.
कामाठीपुरा पुनर्वसन समितीच्यावतीने प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाबाबत सविस्तर सादरिकरण करण्यात आले. 35 एकरवर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून या ठिकणी भव्य इमराती उभ्या करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला . दरम्यान, या प्रकल्पाला गती देण्यासाठी यापूर्वीत दोन तीन वेळा बैठका झाल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत सादरिकरण करण्यात आले असून शासन याबाबत सकारात्मक असल्याची चर्चा या बैठकीत झाली.
कामाठीपु-याचं रूपडं पालटणार आहे. या भागाचा पुनर्विकास होणार आहे. अर्बन व्हिलेज, कामाठीपुरा टाऊनशीप या नावाने हा विभाग ओळखला जाईल. या भागाचा विकास झाल्यावर साडेतीन कोटी स्क्वेअर फूट बांधकाम होणार आहे. त्यामुळे मुंबईतला घरांचा प्रश्न निकाली निघेल. 8 हजार कुटुंबांना नवं घर मिळेल तसंच तेवढीच फ्री सेलचीही घरं उपलब्ध होतील.
मुंबईतल्या सायन प्रतिक्षा नगरमध्ये असलेल्या या दत्त कृपा हाऊसींग सोसायटीतील सर्व रहिवाशांना सध्या धक्का बसलाय. आणि हा धक्का दिलाय तो म्हाडा प्राधिकरणाने. 2004 साली म्हाडाने या इमारतीसाठी लॉटरी खुली केली. या अंतर्गत 31 खोल्यांचे वितरण करण्यात आले. आणि नुकतेच जून 2019 मध्ये म्हाडाने सोसायट्यांच्या नावाने पत्र पाठवत या इमारतीतील 001 खोली क्रमांक हा प्राजक्ता तीखे नावाच्या महिलेला वितरित केल्याचे पत्र पाठवलं. पण धक्कादायक म्हणजे ही खोली ही इमारतीची इलेक्ट्रीक मीटर तसंच कार्यालयाची खोली आहे. आता ही मीटर रुम बदलायची असून कार्यालयही खाली करा असे पत्र म्हाडाने या महिलेला धाडलं आहे. दरम्यान तत्कालिन म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी संबधित खोलीत विजेचे मीटर बसवल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी दिलीय. म्हाडा आता संबधित खोलीची दुरूस्ती करून ती खोली लाभार्थी महिलेच्या ताब्यात देणार आहे.