Motivation News: 17 वर्षीय जो गोब्रियाल एका व्हिडीओमुळे चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. एका व्हिडीओमुळे एका रात्रीत तिचं नशीब बदललं आणि स्टार झाली. जानेवारी महिन्यात तिने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. वडिलांनी भेट म्हणून दिलेल्या पाच हजार रुपयांच्या पर्सला 'लक्झरी' म्हटल्याने खिल्ली उडवण्यात आली होती. यानंतर तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओला करोडोंमध्ये व्ह्यू मिळाले होते. या एका व्हिडीओने तिचं नशीब बदललं.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 'Charles & Keith' कंपनीने तिच्याशी संपर्क साधला. याचं कारण म्हणजे जो गोब्रियाल ज्या पाच हजारांच्या पर्सला लक्झरी म्हटल्याने तिची खिल्ली उडवण्यात आली होती, ती याच कंपनीती होती. या कंपनीने तिला थेट पर्सचं ब्रँण्ड अॅम्बेसिडर बनवून टाकलं. इतकंच नाही तर या पर्सची प्रसिद्धी करण्यासाठी तिला मॉडेल म्हणूनही नियुक्त केलं.
जो गोब्रियाल ही मूळची सिंगापूरची आहे. तिने आपल्या वडिलांनी भेट म्हणून दिलेली पर्स 'लक्झरी' असल्याचा उल्लेख केला होता. आपल्या कुटुंबाकडे जास्त पैसे नसल्याने ही पर्स आपल्यासाठी 'लक्झरी' असल्याचं ती म्हणाली होती. दरम्यान एका युजरने यावरुन तिची खिल्ली उडवली होती. ही पर्स म्हणजे लक्झरी नाही, हे कोणीतरी या मुलीला समजवा असं त्याने म्हटलं होतं.
यावर जो गोब्रियालनेही उत्तर दिलं होतं. माझ्याकडे आणि कुटुंबाकडे इतका पैसा नाही. आम्ही ब्रेडही खरेदी करु शकत नाही अशी स्थिती असते असं तिने म्हटलं होतं. तरसंच तुमच्या कमेंटवरुन तुम्ही तुमच्या संपत्तीमुळे अज्ञानी होत असल्याचं दिसत आहे असा टोलाही लगावला होता.
कदातिच तुमच्यासाठी 5 हजारांची पर्स लक्झरी नसेल. पण माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. माझे वडील मला ही पर्स देऊ शकले याचा मला आनंद आहे. ते पैसे त्यांनी मेहनतीने कमावले आहेत असंही तिने सांगितलं होतं.
जो गोब्रियालने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओची दखल Charles & Keith या कंपनीनेही घेतली. त्यांनी तिच्याशी संपर्क साधला आणि कंपनीची मॉडेल तसंच ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली. यानंतर तिला कंपनीकडून ब्रँडच्या अनेक पर्स गिफ्ट म्हणून देण्यात आल्या आहेत.