..म्हणून हा माणूस २ वर्षाच्या मुलाप्रमाणे दिसतो

जगाच्या कानाकोपऱ्यात अजब गजब गोष्टी दिवसेंदिवस समोर येत असतात. चीनच्या पूर्व भागातल्या ग्रामीण भागातही एक अजब प्रकार समोर आला आहे. इथला एक ३० वर्षाचा युवक २ वर्षाच्या बालकाप्रमाणेच दिसतो.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 13, 2017, 11:45 PM IST
..म्हणून हा माणूस २ वर्षाच्या मुलाप्रमाणे दिसतो  title=

चीन : जगाच्या कानाकोपऱ्यात अजब गजब गोष्टी दिवसेंदिवस समोर येत असतात. चीनच्या पूर्व भागातल्या ग्रामीण भागातही एक अजब प्रकार समोर आला आहे. इथला एक ३० वर्षाचा युवक २ वर्षाच्या बालकाप्रमाणेच दिसतो.

याला पाहण्यासाठी प्रत्येकजण या गावात येत असतो. पण अनेकांना त्याच्या अशाप्रकारे दिसण्याचे कोडे उलगडत नाही. वांग तियानफांग असे याचे नाव आहे.

सोडून देण्याचा सल्ला 

वांग तियानफांगची उंची साधारण ७ इंच आहे. त्याची शारिरिक वाढ झालीच नाही. अनेकजण याला सर्वसाधारण मानवातील मानायलाच तयार नव्हते. त्याला रस्त्यावर किंवा मंदिरात वेगैरे सोडून देण्याचा सल्ला त्याच्या आईवडिलांना देण्यात आला.

पण त्याच्या घरच्यांनी त्याचे योग्य पद्धतीने पालनपोषण केले.

बुद्धीही अविकसित

 वांग याच्या शरीराचाच नव्हे तर मानसिक विकासही होत नसल्याचे दुर्देव आहे. त्यामूळे त्याला संभाळणे हे एक घरातल्यांसमोरचे आव्हान आहे. त्यामूळे वय वर्ष ३० होऊनही बुद्धीचा विकास न झाल्याने २ वर्षाच्या मुलाप्रमाणेच त्याचे वागणे असते.

आईने सोडली नोकरी 

वांगचे पालनपोषण करण्यासाठी त्याच्या आईने नोकरी सोडली. आता ती चहाच्या मळ्यात काम करुन उदरनिर्वाह करीत असते. आता २४ तास ती त्याच्यासोबत असते.