भयंकर पोटात दुखलं, भडाभड उलट्या झाल्या; 15 वर्षाच्या मुलाचा X-ray पाहून डॉक्टर हादरले

या रिपोर्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. एका 15 वर्षाच्या मुलाच्या पोटात अचानक दुखू लागलं. तसेच त्याला ऱूप उलट्या देखील झाल्या. यामुळे त्याच्या घरचे त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या सर्व वैद्यकीय तपासाण्या  केल्या. मात्र, त्याचा X-ray रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्का बसला.

Updated: Dec 21, 2022, 07:16 PM IST
भयंकर पोटात दुखलं, भडाभड उलट्या झाल्या; 15 वर्षाच्या मुलाचा X-ray पाहून डॉक्टर हादरले  title=

Viral News : अनेकदा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भयंकर पोटात दुखू लागलं आणि अचानक भडाभड उलट्या झाल्या म्हणून 15 वर्षाचा मुलगा डॉक्टरकडे गेला. यावेळी त्याचा X-ray रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले.  या मुलाचा एक्स रे रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मुलगा कुठला आहे तसेच ही घटना कुठली आहे याचा नेमका तपशील समोर आलेला नाही. मात्र, या रिपोर्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत.
एका 15 वर्षाच्या मुलाच्या पोटात अचानक दुखू लागलं. तसेच त्याला ऱूप उलट्या देखील झाल्या. यामुळे त्याच्या घरचे त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या सर्व वैद्यकीय तपासाण्या  केल्या. मात्र, त्याचा X-ray रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्का बसला.

X-ray रिपोर्ट या मुलाच्या पोटात 3 फूट लांब मोबाईल चार्जर केबल आणि केसांची क्लिप आढळली. या X-ray रिपोर्टमध्ये छातीच्या खाली पोटाजवळ वायर आणि ही पिन दिसत आहे. यामुळेच मुलाची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी त्वरीत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत जटील अशी शस्त्रक्रिया डॉक्टरांना करावी लागली.  शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी या मुलाच्या पोटातून ही 3 फूट लांब मोबाईल चार्जर केबल आणि केसांची क्लिप बाहेर काढली. 

prof.dr.yasardogan vebe नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊटवरुन या X-ray रिपोर्टचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 15 वर्षाचा मुलगा म्हणजे काही लहान बाळ नाही. यामुळे त्याने चुकून ही केबल खाणे शक्य नाहीच. मग ही केबल त्याच्या पोटात गेली कशी असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. तसेच या प्रकरणावर आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे. या फोटो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. यावर विविध कमेंट्स देखील येत आहेत. यामुलाची मानसिक स्थिती ठीक नसावी अशी शंकानी अनेकांनी उपस्थित केली आहे. 

13 वर्षाच्या मुलीने सेफ्टी पीन गिळली

असाच एक धक्कादायक प्रकार हरयाणा येथे राहणाऱ्या 13 वर्षाच्या मुलीसह देखील घडला होता. अचानक खोकल्याचा त्रास सुरु झाला म्हणून ही मुलगी डॉक्टरकडे गेली. सर्व वैदकीय तपासण्या केल्यानंतर या मुलीचा  CT स्कॅन रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले.  13 वर्षांच्या या मुलीने चुकून सेफ्टी पीन गिळली होती. श्वासाद्वारे ही पिन तिच्या फुफ्फुसात गेली होती. यामुळे मुलीला खोकल्याचा त्रास सुरु झाला. ही पीन मुलीच्या फुफ्फुसात खोलवर रुतली गेली होती. त्वरीत उपचार झाल्याने या मुलीचा जीव वाचला आहे.  हरियाणातील(Haryana) रोहतग येथील  पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांनी या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. तब्बल तीन तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. अचानक खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने ही मुलगी डॉक्टरांकडे गेली असता ही धक्कादायक माहिती समोर आली.