मुंबई : मासे खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. तुम्हाला देखील मासे आवडतात? तर ही बातमी तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे.
दररोज मासे खाणं एका व्यक्तिला चांगलचं महागात पडलं आहे. पाहूयात काय आहे हा संपूर्ण प्रकार...
अमेरिकेत राहणारा एक व्यक्ती दररोज मासे खात असे. त्याने कधी विचारही केला नसेल की मासे खाण्याची आवड त्याच्या जिवावरही बेतू शकते.
अमेरिकेत राहणाऱ्या या व्यक्तीला डायरिया (जुलाब)ची समस्या होती. ज्यावेळी तो बाथरुमला गेला त्यावेळी आपल्या पोटातून काहीतरी बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याला जाणवलं.
या प्रकारामुळे हा व्यक्ती घाबरला आणि त्याने थेट जवळचं हॉस्पिटल गाठलं. यावेळी डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्यांना रुग्णाच्या पोटात किडा असल्याचं आढळलं.
पीडित व्यक्तीला रुग्णालयात पोहोचण्यासाठी आणखीन थोडा उशीर झाला असता तर त्याचा मृत्यूही झाला असता अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
डॉक्टरांनी पीडित व्यक्तीला त्याच्या खाण्याच्या सवयींबाबत विचारलं असता त्याने दररोज मासे खात असल्याचं सांगितलं.
डॉक्टरांनी या व्यक्तीच्या पोटातील किडा बाहेर काढला असून सध्या या व्यक्तीवर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी या किड्याची लांबी मोजली तर सर्वांनाच धक्का बसला. कारण, या किड्याची लांबी तब्बल साडे पाच फूट लांब असल्याचं समोर आलं आहे.
हा किडा माशाच्या माध्यमातून पोटात गेला असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.
मोठ्या प्रमाणात मासे खाल्ल्यानने टेपवर्मची समस्या निर्माण होत असल्याचं बोललं जातं. हे किडे आठवड्याभरात १५ मीटरपर्यंत लांब होऊ शकतात आणि महिन्यापासून वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात. जर या किड्याचा लार्वा शरीराच्या इतर भागात पसरला तर यकृत, डोळे, ह्रदय सारख्या शरीराच्या अवयवांना खाण्यास सुरुवात करतात. यामुळे मानवाचा मृत्युही होऊ शकतो.
डॉक्टरांच्या मते, हा किडा कच्च्या माशांमधून पोटोत पोहोचतो. इतकचं नाही तर अनेकदा भाज्या किंवा मटण खाल्ल्यानेही अशा प्रकारचे किडे पोटात जातात. त्यामुळेच भाज्या शिजवून खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.