Viral News: चार मुलांच्या आईचा मुलाच्या मित्रावरच जडला जीव, त्यानंतर असं काही केलं की नेटकरी संतापले

A woman marries sons friend: ब्रिटनमध्ये (Britain) एका महिलेने चक्क आपल्या मुलाच्या मित्राशी लग्न केलं आहे. तान्या आणि जैसू यांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. दरम्यान, या लग्नामुळे तान्या यांना अनेकदा ट्रोलही (Troll) व्हावं लागलं आहे.   

Updated: Mar 19, 2023, 02:04 PM IST
Viral News: चार मुलांच्या आईचा मुलाच्या मित्रावरच जडला जीव, त्यानंतर असं काही केलं की नेटकरी संतापले title=

A woman marries sons friend: प्रेम आंधळं असतं असं म्हणतात....याचं कारण म्हणजे प्रेम जात, धर्म, वय काहीही न पाहता निर्मळ मनाने व्यक्त होणारी भावना असते. पण तरीही अनेकदा काही प्रेमप्रकरणं ही भुवया उंचवायला लावणारी असतात. ब्रिटनमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने चक्क आपल्या मित्राच्या मुलाशीच लग्न करुन टाकलं आहे. या महिलेचं वय 42 वर्ष असून, यामुळे तिला अनेकांच्या टीकेचाही सामना करावा लागत आहे. 

तान्या असं या ४२ वर्षीय महिलेचं नाव आहे. तसंच ज्या तरुणावर त्याचं प्रेम जडलं आहे त्याचं वय 24 वर्ष आहे. विशेष म्हणजे तान्या यांना चार मुलं आहेत. तान्या आणि जोसू गेल्या तीन वर्षांपासून नात्यात आहेत. ज्यावेळी दोघांमध्ये प्रेम झालं तेव्हा तान्या 39 आणि जोसू फक्त 21 वर्षांचा होता. 

2018 मध्ये तान्या आणि जोसू यांची भेट झाली होती. तान्या यांच्या 12 आणि 14 वर्षांच्या मुलांना जोसूच्या घरी व्हिडीओ गेम खेळण्यासाठी जायचं होतं. तान्या त्यांना सोडण्यासाठी जोसूच्या घऱी गेल्या असता त्यांची पहिल्यांदा भेट झाली. नंतर या भेटीचं प्रेमात रुपांतर झालं. इतकंच नाही तर दोघांनी लग्नही केलं आहे. 

या लग्नानंतर तान्या यांना अनेकांनी धमक्या दिल्या. आपण याप्रकरणी सोशल सर्व्हिसकडे तक्रार करु असं लोक त्यांना सांगत होते. पण दोघांनाही यामुळे काही फरक पडला नाही. दोघेही सोशल मीडियावर अनेक रोमँटिक व्हिडीओ शेअर करत असतात. या व्हिडीओवरही अनेकजण टीका करणाऱ्या कमेंट करत असतात. 

काही नेटकरी तान्या यांच्यावर जोसू याला फसवल्याचा आरोप करतात. त्यावर तान्या यांनी आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो सजग होता असं सांगतात. 

दुसरीकडे काही नेटकरी जोसूलाही दोषी ठरवतात. आपल्या डोक्यावर छत राहावं यासाठी तो तान्याचा वापर करत आहे असा आरोप काहीजण करत आहेत. दरम्यान, आपल्याला या कमेंट्समुळे फरक पडत नसल्याचं दोघेही सांगतात. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू असं ते म्हणतात. 

सुरुवातीला मुलांना हे थोडं विचित्र वाटत होतं. पण आता त्या सर्वांनी जोसूचा स्विकार केला आहे. जोसू त्यांच्यासाठी आता मोठ्या भावापेक्षा जास्त आहे असं त्या सांगतात.