मुंबई : जगातील बहुतांश ठिकाणी कोरोना व्हायरसने आपले पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर जग मोठ्या प्रमाणात नवीन आव्हानांनी प्रभावित झालं होतं. या प्रमाणेच कोरोना व्हायरसचा कहर जगावर होत आहे. पण अजूनही जगात अशी अनेक ठिकाणं आहेत, जागा आहेत, जेथे कोरोना व्हायरसचं संक्रमण पसरलेलं नाही.
प्रशांत महासागराचं बेट तुवालू आणि पूर्व सोव्हियत रिपब्लिक देश तुर्कमेनिस्तान हे असे दोन देश आहेत, ज्या देशांमध्ये अजूनही कोरोनाचं संक्रमण झालेलं नाही. १ एप्रिलपर्यंत या दोनही देशात कोरोनाचं संक्रमण दिसून आलेलं नाही.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकड्यांनुसार, कोरोना व्हायरस जगाच्या १८० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. जगातील एकूण ११ लाखपेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांचा आकडा ५८ हजाराच्या वर गेला आहे, तर २ लाखांपेक्षा जास्त लोक हे कोरोना झाल्यानंतर बरे झाले आहेत.
पण जगभरात अशा ४० जागा आहेत. ज्या ठिकाणी अजूनही कोरोना व्हायरस पसरलेला नाही. अधिकृतपणे कोरोना बाधित येथे असल्याची कोणतीही माहिती १ एप्रिलपर्यंत तरी आलेली नाही.
वरील फोटोत पाहा, कोरोना येथे पोहोचलेला नाही, पोहचूही नये...