१३ वर्षाच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू, आईला ऑनलाईन पाहावा लागला अंत्यसंस्कार

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या अंत्यसंस्कारात देखील आईला जातं आलं नाही.

शैलेश मुसळे | Updated: Apr 4, 2020, 01:08 PM IST
१३ वर्षाच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू, आईला ऑनलाईन पाहावा लागला अंत्यसंस्कार title=

मुंबई : जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ५८,९०० वर पोहोचली आहे. कोरोनामुळे कोणी आपला पती गमवला, कोणी वडील तर कोणी मुलगा. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना त्याच्या अंत्यसंस्कारात देखील सहभागी होत येत नाहीये. त्यामुळे हे दु:ख सहन करणं खरंच वेदनादायक आहे.

कोरोना रुग्णावर उपचार सुरु असताना देखील त्याच्या नातेवाईकांना त्याच्या जवळ जाण्याची परवानगी नसते. इटलीमध्ये अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी देखील परवानगी नाहीये. कारण यामुळे इतरांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता वाढली आहे.

ब्रिटनमध्ये अशीच एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या १३ वर्षाच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आईला शेवटी त्याला पाहायला देखील नाही मिळालं. त्या मुलाची आई आणि इतर ६ भाऊ-बहिनींना देखील आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. सोमवारी जेव्हा ब्रिक्सटनमध्ये राहणाऱ्या या मुलाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या आईला ऑनलाईन मुलाचा अंत्यसंस्कार पाहावा लागला.

डेली मेलच्या अहवालानुसार , इस्माइलच्या अंत्यसंस्कारात काही नातेवाईकांना उपस्थित राहता आलं. पण त्यांना प्रोटेक्टिव सूट घालावा लागला. तसेच त्यांना २ मीटर लांब उभं करण्यात आलं होतं.

हे पण वाचा: लॉकडाऊनमुळेच वाचले हे ११ देश, भारतात पालन होणं गरजेचं

ब्रिटेनमध्ये देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत येथे ३८००० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. काही तरुणांना देखील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळ कोरोनामुळे फक्त वृद्ध लोकांचाच मृत्यू होतो हे म्हणणं आता चुकीचं ठरत आहे.

अधिक वाचा कोरोनाबाबत आणखी एका गोष्टीचा खुलासा, पुरुषांनो सावधान !