तब्बल 9 मुलांसोबत डेट करणारी 35 वर्षीय महिला म्हणते, 'लग्नापूर्वी Sex नाही करणार'

Sex Before Marriage :  तब्बल 9 मुलांसोबत डेट केलं पण शारिरीक संबंध ठेवणार नाही, असं का म्हणतेय 35 वर्षीय महिला...सोशल मीडियावर होतंय चर्चा 

Updated: Dec 17, 2022, 04:25 PM IST
 तब्बल 9 मुलांसोबत डेट करणारी 35 वर्षीय महिला म्हणते, 'लग्नापूर्वी Sex नाही करणार' title=
35 year old Virgin woman who dates 9 boys but Will not have sex before marriage nmp

Virgin Woman on Sex Before Marriage : आपण आज 21 व्या शतकात जगत आहोत. आजच्या युगात कोणाचा बॉयफ्रेंड (boyfriend) नाही किंवा गर्लफ्रेंड (girlfriend) नाही असं सहसा होतं नाही. अगदी विवाहबाह्य संबंधांचे (Extramarital affair) प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलं आहे. आज एक नातं तुटतं दुसरं जुळतं असं असताना 35 वर्षीय महिलेने एक निर्णय घेतला आहे. महिलांमध्ये नात्याबद्दल आणि सेक्सबद्दल (sex) त्यांचा मनात अनेक प्रश्न असतात. 

 

35 वर्षीय महिलेने एक निर्णय घेतला आहे. ती म्हणते की, तिचं वय कितीही झालं तरी ती लग्नापूर्वी सेक्स करणार नाही. अगदी वन नाईट स्टँडचा विचारही तिच्या मनात येतं नाही. विशेष म्हणजे तिने आतापर्यंत 9 मुलांना डेट केलं आहे. 

कोण आहे ही महिला?

भारतीय अमेरिकन सोनाली चंद्रा हिने हा निर्णय घेतला आहे.  ती या निर्णयाबद्दल बोलताना म्हणाली की, ''माझे आईवडील हे ज्या देशात लहानाचे मोठे झाले त्या भारतात लग्नाआधी सेक्स करणे अयोग्य मानले जाते. मी मोठी होत असताना माझे आई वडील सेक्सबद्दल कधी काही बोलले नाही. शिवाय जेव्हा मी आणि माझी 1990 आणि 2000 मधील बॉलिवूड चित्रपट बघायची त्यात किस (kiss video) करताना कुठलेही अभिनेता अभिनेत्री दिसायचे नाही. तर ते फक्त एकमेकांचे हात धरायचे.'' मला भारतीयांची ही परंपरा पुढे न्यायची आहे असं ती म्हणाली.  (35 year old Virgin woman who dates 9 boys but Will not have sex before marriage)

फक्त मला बेडवर न्यायचं आहे...

ती पुढे म्हणाली की, मॅनहॅटमधील सेक्स लाईफ बघून मी हादरली. मी वॉल स्ट्रीटवर कामासाठी जायची तेव्हा तिथे अनेक पुरुष माझ्याकडे आकर्षित व्हायचे. पण त्यांना माझ्यावर प्रेम नव्हतं तर ते फक्त मला बेडवर नेण्यासाठी उत्सुक होते. अशावेळी जर मी एखाद्या व्यक्तीसोबत सेक्स केलं असतं आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळी गायब झाला असता तर माझ्यासाठी खूप अपमानास्पद असतं. ते पुढे असंही म्हणाली की वयाच्या 26 व्या वर्षी मी माझ्या आयुष्यातील पहिलं किस केलं. पण मी कधी पुढे सरकली नाही. 

 

हेसुद्धा वाचा - Relationships : मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचं प्रेमप्रकरण, गर्भवती झाली अन् मग...

'ते 9 पुरूष होते मूर्ख'

महिलेने सांगितले की, 'मी माझ्या आयुष्यात 9 पुरुषांना डेट केलंय. पण सगळेच मूर्ख निघाले. तिघांनी मला प्रपोज केले कारण त्यांना अमेरिकेत काम करण्यासाठी व्हिसा हवा होता.