Unbelievable! जहाजाच्या Rudder वर बसून समुद्रातून 'त्या' तिघांनी ओलांडलं हजारो सागरी मैलांचं अंतर

World News : समुद्रातून प्रवास (Sea) करण्याचा थरार तुम्ही कधी अनुभवला आहे का? अथांग सागराच्या लाटांवर स्वैर होणारं मोठालं जहाज असो किंवा मग एखादी लहानशी बोट असो. 

Updated: Dec 2, 2022, 11:47 AM IST
Unbelievable! जहाजाच्या Rudder वर बसून समुद्रातून 'त्या' तिघांनी ओलांडलं हजारो सागरी मैलांचं अंतर  title=
3 People Traveled 3200 KM hanging in a ship n 11 Days in Dangerous way

World News : समुद्रातून प्रवास (Sea) करण्याचा थरार तुम्ही कधी अनुभवला आहे का? अथांग सागराच्या लाटांवर स्वैर होणारं मोठालं जहाज असो किंवा मग एखादी लहानशी बोट असो. ज्यावेळी या प्रवासाला सुरुवात होते तेव्हा एका अजब आविष्कारानं आपण भारावून जातो. त्यातच दुर्दैवानं एखादं वादळ किंवा सोसाट्याचा वारा जहाजाला धडकला की हा प्रवास एका क्षणात मनात धडकी भरवतो. मग विचार करा, 'त्या' तिघांनी 11 दिवसांचा प्रवास जहाजाच्या रडरवर बसून कसा केला असेल? (3 People Traveled 3200 KM hanging in a ship n 11 Days in Dangerous way)

कोण आहेत ते तिघं? 

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या वृत्तानुसार समुद्रातून जाणाऱ्या एका मोठाल्या जहाजाच्या रडरवर बसून तीन इसमांनी जवळपास 3200 किलोमीटर इतका प्रवास केला. या तिघांच्याही पायापासून साधारण एक वितभर अंतरावर समुद्राच्या लाटा उसळत होत्या. उपलब्ध माहितीनुसार त्यांनी नायजेरियाच्या कनारी बेटापर्यंत हा प्रवास केला. त्यांची ओळख अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही.

हेसुद्धा वाचा : महिलेचा तब्बल 37 हजार फुट उंचीवरून विमानाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न, पुढे काय झालं?

Alithini II या तेलवाहू जहाजाच्या रडारनं त्यांना इतके दिवस आधार दिला होता. रडर ही एक अशी यंत्रणा आहे, ज्यामुळं जहाजाला दिशा देण्यासाठी मदत होते. जहाजाच्या पुढे अतिशय खालच्या बाजूला रडर बसवण्यात येतं. दरम्यान, याच रडरवर बसून प्रवास करणाऱ्या तीन व्यक्तींचा फोटो स्पॅनिश तटरक्षक दलानं शेअर केला होता. हा फोटो पाहून त्या तिघांनी नेमका कसा प्रवास केला असेल हाच प्रश्न अनेकांच्या मनात आला. 

कसा केला प्रवास ? 

Alithini II या जहाजानं नायजेरियाच्या (nigeria) लागोस शहरातून 17 नोव्हेंबरपासून प्रवास सुरु केला होता. 11 दिवसांत ते हजारो सागरी मैलांचं अंतर पार करुन स्पॅनिश (Spain) सीमेत आलं. दरम्यान, त्या तिघांनी नेमका संपूर्ण 11 दिवसांपर्यंत हा प्रवास केला का ही बाब अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात प्रथमोपचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. 

14 वर्षांचा मुलगा जेव्हा सलग 15 दिवस समुद्रातून प्रवास करतो 

सध्या घडलेल्या या घटनेनं 2020 मधील एका प्रसंगाला पुन्हा उजाळा दिला. जिथं 14 वर्षीय नायजेरियन मुलानं 15 दिवसांपर्यंत समुद्रातून प्रवास करत तो लागोसपर्यंत पोहोचला होता. या प्रवासात त्यानं समुद्राचं पाणी पिण्याला प्राधान्य दिलं. तर, रडरवर असणाऱ्या छिद्रावर त्यानं आराम केला होता. 2020 मध्येच आणखी चौघांनी रडरच्या मागे असणाऱ्या एका खोलीत लपून 10 दिवसांचा प्रवास करत स्पेन गाठलं होतं. स्पेनमधील यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी जवळपास 11600 जणांनी समुद्री मार्गानं प्रवास करत देशात प्रवेश केला आहे. यामध्ये आफ्रिकन शरणार्थींचा सर्वाधिक समावेश आहे.