आयफोनसाठी तरुणाने विकली किडनी

मोबाईल माणसांना लागलेल एक प्रकारचे व्यसन आहे. 

Updated: Jan 1, 2019, 08:10 PM IST
आयफोनसाठी तरुणाने विकली किडनी title=
Representational Image: Photo: PTI

 

बीजिंग : जगभरात क्रांती घडत गेल्याने अनेक उपकरणे जगासमोर येवू लागली. काही दिवसानंतर ही उपकरणे माणसाची गरज बनू लागली. माणूस प्रत्येक गोष्टीत यंत्राचा वापर करु लागला आहे. यात मोबाईल हे दूरच्या व्यक्तीसोबत संपर्क साधण्यासठी वापरले जाणारे यंत्र होते. आजच्या काळात मोबाईल माणसांना लागलेल एक प्रकारचे व्यसन आहे. याच मोबाईलच्या वेडापाई एका तरुणाने चक्क आपली किडनी विकली. मात्र, भविष्यात त्याच्यापुढे काय वाढून ठेवले, हे त्याला उभारत्या वयात समजले नाही. आयफोनसाठी त्यांने किडनी विकली. मात्र, आज तो आपले आयुष्य बेडवर घालवत आहे.

मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी जावून चीनमधील तरुणाला त्याची किडनी गमवावी लागली आहे. २०११मध्ये चीनच्या जिओ वँग नावाच्या एका तरुणाने सात वर्षांपूर्वी 'आयफोन-४' खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याच्याजवळ पैसे नव्हते. तो आयफोनच्या प्रेमात पडला. मोबाईल मिळविण्यासाठी त्याने वाट्टेल ते करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने स्वतःची किडनी विकली. आयफोन खरेदी केल्याने शाळेतील मित्रांवर वेगळी छाप निर्माण करण्याकरिता हा वेडेपणा केला होता. जिओ वॅंगने आपली किडनी विकण्याचा अतिशय चुकीचा मार्ग निवडला.

वँगने एक किडनी ३,२०० अमेरिकन डॉलरला (२ लाख २३ हजार २६५ रुपये) विकली. त्यातून त्याने 'आयफोन-४' खरेदी केला. वँग आता २४ वर्षांचा आहे. किडनी काढण्यापूर्वी वॅंगला मित्रांकडून सांगण्यात आले की, एक किडनी काढल्याने त्याचे काही दुष्परिणाम होत नाही, एका आठवड्यातच माणूस ठणठणीत होतो. परंतु, किडनीची शस्त्रक्रिया करताना वॅंगला संसर्ग झाला आणि ७ वर्षांपासून तो अंथरुणावर पडून आहे. दरम्यान, आयफोनसाठी किडनी विकण्याचा निर्णय वॅंगने घरच्यांपासून लपवून ठेवला होता. दरम्यान, आज उपचार करण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडे पैसेही नाहीत. कुटुंबाने बराच खर्च केल्याने तेही कर्जबाजारी झाले आहेत.