गळ्याला दुपट्टा गुंडाळून 16 वर्षांची मुलगी करत होती स्टंट, तितक्यात पकड घट्ट झाली अन्...

Viral News: TikTok वर सध्या सुरु असणाऱ्या 'स्कार्फ गेम' मध्ये मेंदूला होणारा ऑक्सिजनचा प्रवाह रोखण्यासाठी गळ्यात कपडा बांधला जातो. हाच धोकादायक स्टंट करताना एका 16 वर्षांच्या मुलीला आपला जीव गमावावा लागला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 11, 2023, 12:06 PM IST
गळ्याला दुपट्टा गुंडाळून 16 वर्षांची मुलगी करत होती स्टंट, तितक्यात पकड घट्ट झाली अन्... title=

Viral News: सोशल मीडिया म्हटलं की त्याचे फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजू असतात. आता त्यातील कोणती बाजू निवडायची हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. याच निवडीवर अनेकदा आपलं भवितव्यही अवलंबून असतं. कारण चुकीची बाजू निवडली तर त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यातलाच एक भाग म्हणजे सोशल मीडियावर मनोरंजनाच्या नावाखाली धोकादायक स्टंट खेळणं. असाच एक स्टंट खेळताना एका 16 वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. 

TikTok वर एक 'स्कार्फ गेम' नावाचा स्टंट खेळला जात आहे. हा गेम खेळताना एका 16 वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. 'Blackout Challenge' चं व्हेरिएशन असणाऱ्या या खेळात गतवर्षी अनेकांनी जीव गमावला आहे. 

Christy Sibali Dominique Gloire Gassaille असं या मुलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी तिने आपल्या घऱात हा जीवघेणा स्टंट करत आपला जीव गमावला. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या 'स्कार्फ गेम' मध्ये मेंदूला होणारा ऑक्सिजनचा प्रवाह रोखण्यासाठी गळ्यात कपडा बांधला जातो. पूर्ण बेशुद्ध होईपर्यंत हा कपडा गळ्याभोवती गुंडाळलेला असतो. काही लाइक्स मिळवण्याच्या नादात खेळल्या जाणाऱ्या या खेळात 16 वर्षांच्या मुलीला आपला जीव गमावावा लागला आहे. 

7 जून रोजी या मुलीवर फ्रान्समधील ऑर्लिन्स येथील राहत्या घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्त्वाची बाब म्हणजे, चिनी मालकीच्या TikTok मध्ये 'स्कार्फ गेम' सारखे अनेक धोकादायक गेम आहेत, जे मेंदूला होणार ऑक्सिजनचा पुरवठा रोखतात. तसंच गंभीर दुखापत, मृत्यूचा धोका निर्माण करतात. TikTok वर व्हायरल चॅलेंज 'ब्लॅकआउट चॅलेंज' मध्येही अशाच प्रकारचा धोका होता. 

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, TikTok वर 'scarf game' सर्च केलं असता आता कोणतेही परिणाम दिसत नाही. व्हिडिओ-शेअरिंग अॅपने आता युजर्सना याउलट योग्य काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सुरक्षित आणि सकारात्मक गोष्टींचा प्रसार करणं आमचं प्राधान्य आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 

व्हायरल 'TIKTOK' चॅलेंजमुळे याआधीही मृत्यू

जानेवारीमध्ये, फास घेत प्राणघातक स्टंट करण्याच्या प्रयत्नात 12 वर्षीय मिलाग्रोस सोटोचा मृत्यू झाला होता. हा स्टंट तिने कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला होता. शाळेत तिची रॅगिंग केल्यानंतर व्हॉट्सअपवर तिला या स्टंट आव्हान देणारा एक संदेश आला होता. त्यात चॅलेंजची लिंक होती. यानंतर तिने हा स्टंट केला होता अशी माहिती तिच्या नातेवाईकाने दिली होती. 

दरम्यान 2022 मध्ये युके येथे 14 वर्षीय Leon Brown आणि 12 वर्षीय Archie Battersbee यांनी व्हायरल चॅलेंज पूर्ण करताना आपला जीव गमावला होता.