मुंबई : आज वटपौर्णिमा.. या वर्षी अधिक ज्येष्ठ महिना आल्यामुळे वटपौर्णिमेपासूनचे सर्व सण सुमारे वीस दिवस उशीरा येत आहेत. सावित्रीने यमधर्माशी चातुर्याने तत्त्वचर्चा करून आपल्या पतीचा म्हणजेच सत्यवानाचा प्राण परत आणला. शास्त्रातील या कथेचा आधार घेऊन भारतीय स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करतात व दिवसभर उपवास करतात.
ज्यादिवशी सूर्यास्तापूर्वी सहा घटिका म्हणजे दोन तास चौवीस मिनिटे ज्येष्ठ पौर्णिमा असेल तो दिवस वटपौर्णिमा साजरी करण्याचा मानला जातो. वटपौर्णिमा : 'या' आधुनिक सावित्रीला सलाम...
बुधवार दि २७ जून रोजी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी ज्येष्ठ पौर्णिमा सुरू होते. म्हणून आज वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. सण उत्सव हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. म्हणून ते साजरे करतांना प्रदूषण होणार नाही, निसर्गाला धोका पोहोचणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी असंं आवाहन श्री . दा. कृ. सोमण यांनी केल आहे. मग यंदा अशाप्रकारे वटपौर्णिमा साजरी करून बघा.