नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खिलाडी कुमार अनोख्या युक्त्या वापरत आहे. त्यापैकी एक म्हणजे पॅड चॅलेंज. सेलिब्रेटींना हातात पॅड घेऊन सेल्फी पोस्ट करण्याचे चॅलेंज देण्यात आले होते.
आमिर खान, अनिल कपूर, राजकुमार राव, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट यांसारख्या सेलिब्रेटींनी हे चॅलेंज पूर्ण देखील केले. मात्र सेलिब्रेटी प्रमोशन करत असलेले पॅड्स महिलांच्या आरोग्यासाठी योग्य नाहीत. याबद्दलचे वास्तव हैराण करणारे आहे.
अधिकतर महिलांना हे माहित नाही की, भारतात दर महिन्याला अधिकतर सॅनिटरी पॅड्स कचऱ्यात जातात. त्याची विल्हेवाट कशी लावावी, याची माहिती कोणालाही नाही. त्यामुळे हे पॅड्स पर्यावरणाला हानीकारक ठरत आहेत.
एका सर्वेनुसार, भारतातील सुमारे ३३.६ कोटी मुली आणि महिलांना मासिक पाळी येते. याचा अर्थ त्यातील सुमारे १२.१ कोटी महिला सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करतात. याचा अर्थ एक महिला आपल्या आयुष्यात ११००० ते १७००० सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करत आहे. म्हणजे वर्षाला ६.२५ सॅनिटरी नॅपकिन्स वापरले जातात. यामुळे वापरुन झालेले नॅपकिन्स पर्यावरणाला धोका निर्माण करत आहेत.
सॅनिटरी नॅपकिन्स ९०% प्लास्टिकने बनलेले असतात. त्यामुळे मासिक पाळीत याचा वापर करता होतो तेव्हा त्यामुळे योनीमार्ग ब्लॉक होतो. उरलेले १०% यात केमिकल्स आणि परफ्यूम वापरले जातात. त्यामुळे हार्मोनल समस्या उद्भवतात.