दुपारी झोपण्याचे तोटे माहित आहेत का?

शरीरातील फॅटस म्हणजेच मेदाचे प्रमाण वाढते,  अतिप्रमाणामुळे वजन वाढू लागतं, वजन वाढल्याने अनेक आजार बळावतात.

Updated: Oct 29, 2017, 08:32 PM IST
दुपारी झोपण्याचे तोटे माहित आहेत का? title=

मुंबई : अनेक व्यक्तींनी दुपारी झोपण्याची सवय लागते, झोप ही निरोगी आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. मात्र दुपारी जेवण झाल्यावर झोपण अनेकांना आवडतं.
 
दुपारच्या झोपेमुळे कफदोष आणि पचनाला अडचणी येतात. याबरोबर शरीरात मेदाचा देखील संचय वाढत जातो. यासाठी दुपारची झोप टाळलेलीच बरी.

शरीरातील फॅटस वाढतात

शरीरातील फॅटस म्हणजेच मेदाचे प्रमाण वाढते,  अतिप्रमाणामुळे वजन वाढू लागतं, वजन वाढल्याने अनेक आजार बळावतात.

कफदोष वाढतो

दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते.

मधुमेहाचा धोका वाढतो

दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. तुम्हाला मधूमेह होण्याची शक्यता देखील वाढते.

त्वचा रोगाचा धोका

कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. याचसोबत रक्त दूषित होण्याचीही शक्यता असते. यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शितपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.