अविवाहित पुरुषांना विवाहित महिला का आवडतात? कारण जाणून तुम्ही पण म्हणाल, 'अच्छा ! हे असं आहे तर...'

Married Women Relationship: अविवाहित पुरुष विवाहित महिलांच्या प्रेमात का पडतो, असा अनेकांना प्रश्न नेहमीच पडतो. अविवाहित पुरुषांच्या नजरेत विवाहित महिलांचे आकर्षण वाढण्याचे कारण काय?, यामागे अनेक मनोरंजक कारणे आहेत.

Updated: Jun 2, 2023, 12:25 PM IST
अविवाहित पुरुषांना विवाहित महिला का आवडतात? कारण जाणून तुम्ही पण म्हणाल, 'अच्छा ! हे असं आहे तर...' title=

Married Women Relationship Tips in Marathi: अविवाहित पुरुषांना विवाहित महिला का आवडतात, हे तुम्हाला माहित आहे का? याचे कारण जाणून तुम्ही पण म्हणाल, 'अच्छा, हे असं आहे तर ! सिंगल राहणाऱ्या मुलांना अनेकवेळा अविवाहित महिला आवडतात. मात्र, हे सर्वसामान्य आहे, परंतु बऱ्याच लोकांना हे समजत नाही की तरुण मुले विवाहित महिलांकडे का आकर्षित होतात.

तुम्ही अनेकवेळा एकमेकांसोबत वेळ घालवला तर तुमच्यात एक प्रकारचे नातेसंबंध दृढ होतात. त्याचवेळी भिन्न लिंग व्यक्ती एकमेकांच्या सहवासात सातत्याने राहिल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध फुलतात. ही गोष्ट तशी सामान्य आहे. परंतु तुमच्या अनेकदा लक्षात आले असेल की अनेक सिंगल तरुण हे विवाहित महिलांच्या प्रेमात पडतात. त्या त्यांच्या क्रश असतात. त्यांना माहित असते की इथे आपले काहीही चालणार नाही, तरीही त्यांची विवाहित स्त्रियांवरुन नजर हटत नाही. असे असले तरी सिंगल पुरुषांच्या नजरेत विवाहित महिलांचे आकर्षण वाढण्याचे कारण काय, हे जाणून घेतले तर यामागची अनेक मनोरंजक कारणे सांगण्यात येत आहेत.

विवाहित महिलांबद्दल आकर्षण असण्याचे कारण

1.  विवाहानंतर, मुलींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्या केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठीही खूप काळजी घेतात. अनेक मुलांना हा काळजीवाहू स्वभाव आवडू लागतो. 

2.  विवाहित महिलांचा ड्रेसिंग सेन्स कधीकधी अविवाहित मुलींपेक्षा चांगला असतो, जो अनेक तरुण मुलांना आवडतो आणि ते हळूहळू आकर्षित होऊ लागतात.

3.  लग्नानंतर अनेक स्त्रियांची मॅच्युरिटी लेव्हल वाढते. जी अनेकदा अविवाहित आणि तरुण मुलींमध्ये दिसून येत नाही. आयुष्याकडे पाहण्याचा हुशार दृष्टीकोन मुलांना आनंदित करतो.

4.  विवाहित स्त्रिया अविवाहित मुलींपेक्षा अधिक आत्मविश्वासपूर्ण असतात, जे त्यांच्या चेहऱ्यावरुन स्पष्टपणे दिसून येते. ज्यामुळे त्या थोड्या अधिक आकर्षक दिसतात.

5. विवाहानंतर स्त्रिया त्यांच्या दिसण्यावर नटणे-सजण्यावर अधिक लक्ष देतात आणि त्वचेची काळजी घेण्याबाबत अनेक रुटीन फॉलो करतात, ज्यामुळे त्या पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या दिसतात.

6.   अनेक महिला लग्नानंतर स्‍ट्रेट फॉरवर्ड होतात. थेट बोलण्यात त्यांचा विश्वास असतो. ती कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करत नाही. 

भारतीय समाजात हे योग्य मानले जात नाही !

भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांना पसंत करणे आणि त्यांच्याकडे आकर्षित होणे अजिबात योग्य मानले जात नाही. जर एखादा मुलगा विवाहित महिलेच्या मागे जातो किंवा तिला डेट करण्याचा प्रयत्न करतो, तर तो स्वत: साठी संकट निर्माण करतो. मुलांनी अशा आकर्षणाच्या फंदात न पडणे हेच चांगले आहे.