'मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी'

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. 

Updated: Jul 14, 2017, 11:56 AM IST
'मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी' title=

मुंबई : महिलांसाठी ही बातमी दिलासादायक आहे. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. 

शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी ही मागणी करणाऱ्या ठरावाची सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना दिली आहे. 

यात शितल म्हात्रेंनी शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुट्टी देण्याची मागणी केली आहे.