Pregnancy दरम्यान अति-प्रमाणात पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी धोकादायक?

अशातच गरोदरपणात पाण्याच्या प्रमाणाचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 

Updated: Jun 24, 2022, 12:33 PM IST
Pregnancy दरम्यान अति-प्रमाणात पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी धोकादायक? title=

मुंबई : गर्भधारणेदरम्यान अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. यावेळी खासकरून खाण्या-पिण्याची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण अयोग्य आहार आई आणि बाळ दोघांनाही हानी पोहोचवू शकतो. अशातच गरोदरपणात पाण्याच्या प्रमाणाचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 

स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी, एखाद्याने दररोज किमान 8-10 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. जेणेकरून आपलं शरीर चांगलं हायड्रेटेड राहील. पण तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे की, गरोदर महिलांनी फक्त योग्य प्रमाणात पाणी घेणं महत्वाचं आहे. यामध्ये जास्त किंवा खूप कमी देखील नाही.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, गर्भवती महिला शरीराला पाणी, ऑक्सिजन तसंच इतर अनेक महत्त्वाच्या पोषक घटकांचा पुरवठा करतात. यामुळे बाळाला पोषणही मिळतं. याशिवाय बाळाला जन्मापूर्वीची सर्व जीवनसत्त्वंही पाण्यातून मिळतात. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यावं. 

गर्भवती महिलांच्या शरीरात पाण्याच्या सेवनामुळे पचनक्रियाही सुरळीत होते आणि शरीरात नवीन पेशीही तयार होतात. पण जास्त पाणी पिणे गर्भवती महिलांसाठीही हानिकारक ठरू शकतं.

पाणी का आवश्यक आहे? 

पाण्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात, जसं की ते तुम्हाला हायड्रेट ठेवतं. हे गर्भधारणेदरम्यान होणारे क्रॅम्प्स देखील कमी करतं. यासोबतच गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता सारख्या समस्याही कमी होतात. संतुलित प्रमाणात पाण्याने तुम्हाला ऊर्जा मिळते आणि शरीराचं तापमानही नियंत्रणात राहतं.

अति पाण्याच्या सेवनामुळे होणारं नुकसान

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जास्त पाणी पिणं हे गर्भवती महिलांसाठीही खूप हानिकारक ठरू शकतं. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. जसं की, जास्त पाणी प्यायल्याने तुम्हाला थकवा जाणवेल.जेव्हा तुम्ही जास्त पाणी पिण्यास सुरुवात करता तेव्हा तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटची पातळी कमी होते आणि शरीराचे संतुलनही बिघडतं. परिणामी डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.