मुंबई : कोणतीही कला ही आनंद देणारी असते. कलेचा आनंद कलाकाराबरोबरच इतरांना देखील मिळतो. नृत्य ही आपली पारंपरिक कला आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यालाअत्यंत यशस्वी आणि मोठा इतिहास आहे. त्यातील प्रत्येक क्रियेला सुरेख अर्थ आहे.
तसंच शास्त्रीय नृत्य शिकण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.हे फायदे जाणून घेण्यासाठी आम्ही ठाण्याच्या होमीओपॅथिक डॉक्टर, न्यूट्रीशियनिस्ट आणि कथ्थक नृत्यालंकार अदिती देशकर-आजरेकर यांच्याशी संवाद साधला. मग जाणून घेऊया त्यांनी सांगितलेले शास्त्रीय नृत्यातून अतिशय चांगला शारीरिक व्यायाम.
आजकालची आपली जीवनशैली फारच धावपळीची आणि गुंतागुंतीची झाली आहे. अभ्यासाचा, कामाचा आणि इतर गोष्टींचा ताण अधिक वाढला आहे. त्यामुळे शरीर व मनावर खूप ताण येतो. हा ताण दूर करून मानसिक शांतता आणि समाधान देण्यासाठी शास्त्रीय नृत्याचा खूप फायदा होतो.
त्याचबरोबर आपल्या वस्त जीवनशैलीतून आपल्याला व्यायामासाठी वेळ मिळत नाही. तर तुमची ही तक्रार दूर करण्यासाठी देखील शास्त्रीय नृत्य कामी येते. कारण शास्त्रीय नृत्यातून अतिशय चांगला शारीरिक व्यायाम होतो.