कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात हा मोठा बदल; महिलांचा दावा

आता महिलांना कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीराच बदल झाल्याचं दिसून आलं आहे.

Updated: Jan 23, 2022, 09:49 AM IST
कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात हा मोठा बदल; महिलांचा दावा title=

अमेरिका : कोरोनाची लस घेतल्यानंतर अनेकांना विविध परिणाम दिसून आले. असंच आता महिलांना कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीराच बदल झाल्याचं दिसून आलं आहे. अमेरिकन कोरोना लस Pfizer बाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी दावा केलाय  की, फायझर लसीचा डोस घेतल्यानंतर त्यांच्या स्तनांच्या आकारात वाढ होतेय.

ऑस्ट्रेलिया महिलांच्या या दाव्यानंतर हा कोविड लसीचा दुष्परिणाम असल्याचं म्हटलं जातंय. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी दोन लसी दिल्या जातायत. त्यापैकी एक फायझर आहे.

अहवालानुसार, सामान्यतः, कोरोना लस दिल्यानंतर, लोकांना डोकेदुखी, थकवा, फ्लू सारखं दुष्परिणाम दिसतात. त्याचप्रमाणे ज्या हातावर इंजेक्शन दिलंय त्या ठिकाणी वेदना होत असल्याची तक्रार आहे. 

दरम्यान ऑस्ट्रेलियातील अनेक महिलांना फायझरचा डोस घेतल्यानंतर त्यांच्या स्तनांना आकार वाढला असल्याचं आढळून आले आहे. लिम्फ नोड्स (लिम्फ ग्रंथी) मध्ये सूज आल्याने हे होत असल्याची माहिती आहे.

ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही वेळा लिम्फ नोड्सला सूज येऊ शकतात. हा लसीच्या दुष्परिणामांपैकी एक आहे. मात्र हा दुष्पपरिणाम सामान्यपणे आढळून येत नाही. 

अमेरिकेतही फायझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. लस दिल्यानंतर तिथल्या डॉक्टरांना, लसीकरण झालेल्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या तपासणीचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलंय.

दरम्यान लस घेतल्यानंतर महिलांच्या लिम्फ नोड्समधील सूज किती काळात कमी होते हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण हे तात्पुरतं लक्षण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.