सांगलीत प्रशासनाच्या इच्छेविरुद्ध जमावबंदी; १० कोटींची उलाढाल ठप्प

सांगली शहरात दहशत निर्माण झाली आहे

Updated: Dec 28, 2021, 03:35 PM IST
सांगलीत प्रशासनाच्या इच्छेविरुद्ध जमावबंदी; १० कोटींची उलाढाल ठप्प title=

सांगली : सांगलीच्या सीमेवर घुटमळणारा गवा मध्यरात्री सांगली शहरात दाखल झाला. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून गव्याने मार्गक्रम करीत सकाळच्या सुमारास मार्केट यार्ड गाठले. त्यामुळे शहरात दहशत निर्माण झाली आहे.

वन विभाग, स्थानिक पोलीस आणि प्राणीमित्र गव्याला पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र गवा मुख्य शहरात दाखल झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगलीच्या मार्केट कमिटीमध्ये गवा घुसल्याने या ठिकाणी जमावबंदी लागू केलीय.

दोन दिवसांपूर्वी सांगली वाडीत दिसलेला गवा आज मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे सांगली शहरात दाखल झाला आहे. 

टिळक चौक मार्गे गवा शहरात आला असून वाखारभाग, कॉलेजकॉर्नर मार्गे तो सध्या सांगलीच्या मार्केट यार्डात दाखल झाला आहे. 

त्याला त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी पाठवण्यासाठी वन विभाग, स्थानिक पोलीस आणि प्राणीमित्र प्रयत्न करत आहेत मात्र गवा मुख्य शहरात दाखल झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्रीपासून गवा मार्केट यार्डमध्ये आहे. गवा मार्केट यार्डमध्ये ठाण मांडून बसल्यानं इथली 10 कोटींची उलाढाल ठप्प झालीय.