मुंबई / कोल्हापूर : कोरोनाचे संकट असताना अनेक बाधिक रुग्ण ठणठणीत होत आहेत. ८३ वर्षांच्या आजीसह सहा महिन्याच्या चिमुकलीने कोरोनावर मात केली आहे. खुद्द याची माहितीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. आतापर्यंत राज्यभरात ३३१ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आता आणखी काही घटना पुढे आल्या आहेत. मुंबईतील घाटकोपर येथे घरी परतलेल्या महिलेचे जोरदार स्वागत करण्यात आले. तर कोल्हापुरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बुलडाणा आणि हिंगोली येथेही बरे झालेल्या रुग्णांचे स्वागत करण्यात आले.
कोविड-१९चे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असताना त्यातून बरे झालेल्या रुग्णांनमध्येही वाढ होताना दिसत आहे. कोरोनातून संपूर्ण बरे झालेल्या रुग्णाचे स्वागतही स्थानिक लोक करीत आहेत. घाटकोपरच्या भटवाडी येथील माता महाकाली मंडळातील एक महिला करोना बाधित झाली होती. मात्र, ती आता ठणठणीत झाली आहे. रुग्णालयात यशस्वी उपचार घेतल्यानंतर ती पूर्ण बारी झाली आणि तिला घरी सोडण्यात आले. घरच्या परिसरात प्रवेश करताच त्या महिलेला सुखद धक्काच बसला. परिसरातील बरेच जण बाहेर उभे होते आणि तिचे टाळ्या वाजवून स्वागत करीत होते. तिने देखील हे स्वागत हाथ जोडून स्वीकारले. स्वागत करताना सोशल डिस्टन्स पाळले गेले.
बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, नर्सेस यांनी टाळ्या वाजवून व्यक्त केला आनंद. रूग्णवाहिकेतून तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या सर्व ‘पॉझीटीव्ह’ प्रयत्नांमुळे अखेर कोरोनाला ‘निगेटीव्ह’ करीत पहिल्या तीन रुग्णांना रूग्णालयातून १७ एप्रिल रोजी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला.
#WarAgainstVirus
प्रशासनाच्या ‘पॉझिटिव्हीटी’ पुढे #कोरोना झाला ‘निगेटिव्ह’!#बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, नर्सेस यांनी टाळ्या वाजवून व्यक्त केला आनंद. रूग्णवाहिकेतून तीन रूग्णांना सोडले घरी➡ विशेष वृत्त- https://t.co/frt54kuCnj pic.twitter.com/kXt8VYYYG4
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 17, 2020
कोल्हापुरातून आनंदाची बातमी. कोल्हापुरात कोरोनाचे एकूण सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते, त्यापैकी दोन रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.. भाऊ-बहीण असणाऱ्या या दोघाही पेशंटना कोल्हापुरातील अथायु हॉस्पिटलमध्ये २७ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. या दोघा रुग्णांचे रिपोर्ट दोन्ही वेळेला निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला पोझिटिव्ह रुग्ण हा कोरोनामुक्त झाला असून त्याला जिल्हा रूग्णालयाच्यातर्फे डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी आयसोलेशन वार्डातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी भावूक होऊन ‘हम होंगे कामयाब, एक दिन’ गीत सादर केले आणि कोरोनामुक्त रुग्णालाआनंदाने निरोप दिला.