सांगली: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचे धागेदोरे उलगडताना दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) हाती आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती लागली आहे. त्यानुसार राज्यातील आणखी एक विचारवंत कट्टरतावद्यांच्या रडारवर आहे. याप्रकरणी एटीएसने सांगलीच्या तासगाव तालुक्यातून दोघांना ताब्यात घेतले.
यानंतर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याववर तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रीत केले आहे. दुसरीकडे पुरोगामी संघटनेचे नेते आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. बाबुराव गुरव यांना सतर्क राहण्याच्या सूचना एटीएस आणि पोलिसांनी दिल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेतत वाढ करण्यात आली आहे. गोवा स्फोट आणि दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणात सांगलीचं नाव येणे दुर्दैवी असल्याची चिंता ज्येष्ठ विचारवंत बाबुराव गुरव यांनी व्यक्त केली होती.