पुणे: धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पुण्यातील आदिवासी विकास आणि प्रशिक्षण संस्थेत दोन तरुणांकडून तोडफोड करण्यात आली. या तरुणांनी कार्यालयाच्या इमारतीच्या काचा फोडल्या आणि खुर्च्यांचीही मोडतोड केली.
धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करावा या मागणीसाठी काही कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र, ते अचानक आक्रमक झाले. त्यांनी पत्रके भिरकावत आणि भंडारा उधळून त्यांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या.