शरद पवारांच्या नकारानंतर पार्थच्या उमेदवारीबाबत अजितदादांचे सूचक वक्तव्य

तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार?

Updated: Oct 6, 2018, 08:47 PM IST
शरद पवारांच्या नकारानंतर पार्थच्या उमेदवारीबाबत अजितदादांचे सूचक वक्तव्य title=

पुणे: अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ याला मावळ मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिकुलता दर्शवली होती. त्यामुळे पार्थ यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. परंतु, आता अजित पवार यांच्या नव्या वक्तव्यामुळे हा संभ्रम आणखीनच वाढला आहे. आजच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांनी अजितदादांना याविषयी छेडले. यावेळी पत्रकारांनी शरद पवारांच्या भूमिकेविषयी दादांना विचारले. त्यावर 'अजून बऱ्याच घडामोडी घडायच्या आहेत', असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले. 

पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार?, असा सवाल शरद पवार यांनी आजच्या बैठकीत उपस्थित केला होता. त्यामुळे पार्थचा राजकीय मुहूर्त लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत होती.