Viral Video : Mumbai तील एक विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद, प्रवासी हैराण

Mumbai Video: मुंबईतील रस्त्यावरुन प्रवास करताना ही विचित्र घटना तुम्ही पाहिली का? या विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.   

Updated: Dec 22, 2022, 01:03 PM IST
Viral Video :  Mumbai तील एक विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद, प्रवासी हैराण  title=
mumbai led display board flashes smoke weed everyday video viral on Social media nmp

Smoke Weed Everyday Viral Video : मुंबईत अर्ध्याहून अधिक मुंबईकर हे लोकलने (Mumbai Local Video) प्रवास करतात. त्याकाही लोक हे बेस्ट (Best), टॅक्सी (taxi) , रिक्षा (rickshaw) आणि खाजगी गाड्यांनी प्रवास करतात. मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्याने खूप वेळ लागतो. मुंबईत (mumbai news) कधी पावसाचा थैमानामुळे रस्त्यांना नदीचं स्वरुप येतं, तर कधी अनेक मोर्चाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय दिसतो. मुंबईत कायम मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा (traffic jam) सामना करावा लागतो. सध्या मुंबईत (mumbai traffic jam) एक विचित्र घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (video viral on social media) होतो आहे. 

विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद

मुंबईतील (mumbai viral vidoe) लोकप्रिय पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळ हाजी अली (Haji Ali) या परिसरातून प्रवास करताना प्रवासी थक्क झाला. हाजी अली दर्ग्याजवळील वळणाच्या शेजारी असलेल्या एका एलईडी साइन बोर्डवर (LED sign board) एक असामान्य संदेश दिसला. तिथल्या डिजिटल डिस्प्लेवर "स्मोक वीड एव्हरीडे" (Smoke Weed Everyday) असं ठळक लाल फॉन्टमध्ये स्क्रोल होत होता. हा संदेश बघून प्रवासी हैराणही झाले आणि त्यांना हसू देखील आवरतं नव्हतं. कोणालाही हा संदेश का येतो आहे, याबद्दल काही कळतं नव्हतं.  (mumbai led display board flashes smoke weed everyday video viral on Social media)

व्हिडिओ व्हायरल 

हा व्हिडिओ एका प्रवाश्याने आपल्या मोबाईलमध्ये (Mobile vidoe) शूट केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केला. आता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अनेक वापरकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना या प्रकरणाची दखल घेण्यासाठी टॅग केलंय . हा व्हिडिओ 20 डिसेंबर रोजी शेअर झाल्यानंतर या घटनेचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर (viral video) चांगलाच खळबळ माजवल्याचं दिसत आहे. 

व्हिडिओवर स्पष्टीकरण

वाहतूक विभागाचे सह आयुक्त प्रवीण पडवळ (Joint Commissioner of Transport Department Praveen Padwal) यांनी सांगितलं की, एल अँड टी कंपनी या डिस्प्लेसाठी जबाबदार आहे आणि तांत्रिक बिघाडामुळे (Technical failure) अयोग्य संदेश दाखवला गेला. शिवाय अभियंता ठाकरे (Engineer Thackeray) यांनी माहिती दिली की, त्यांनी समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या IT टीमशी संपर्क साधला होता आणि तो डिस्प्ले (display) दुरुस्त होईपर्यंत तो बंद करण्यात आला आहे.