साडे पाच लाखांचे बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

साडे पाच लाख बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यासह एका जनमिलिशीयास गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे.   

Updated: Apr 7, 2024, 11:44 PM IST
साडे पाच लाखांचे बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई title=

Gadchiroli Crime News : साडे पाच लाखांचे बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.  गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यासह एका जनमिलिशीयास देखील गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे. 

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  2024 च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल महिला नक्षलीस व टिटोळा गावच्या पोलीस पाटलाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या एका जनमिलिशीयास आज अटक केली. सुरक्षा दलाच्या हालचालींचा आढावा घेण्याच्या हेतूने जहाल महिला माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे.   काजल ऊर्फ सिंधू गावडे (वय 28 वर्षे, रा. कचलेर तह. एटापल्ली, जि. गडचिरोली) आणि गीता ऊर्फ सुकली कोरचा (वय 31 वर्षे, रा. रामनटोला, तह. एटापल्ली जि. गडचिरोली) अशी अटक झालेल्या महिला नकक्षलवाद्यांची नावे आहेत. 

गडचिरोली-कांकेर (छ.ग.) सिमेवरील पोस्टे पिपली बुर्गी हद्दीतील मौजा जवेली जंगल परिसरात संशयितरित्या फिरत आहेत. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, पोस्टे पिपली बुर्गी पोस्ट पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस बल जी -192 बटा. च्या जवानांनी सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवून त्यांना ताब्यात घेतले. 

यासोबतच मागील वर्षी सन 2023 मध्ये मौजा टिटोळा ते पामाजीगुडा जंगल परिसरात झालेल्या माहे नोव्हेंबर 2023 मध्ये टिटोळा पोलीस पाटीलाच्या हत्येच्या अनुषंगाने पोस्टे एटापल्ली येथे दाखल गुन्ह्रातील पाहिजे असलेला आरोपी जनमिलिशीया नामे पिसा पांडू नरोटे, रा. झारेवाडा, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.  तो गिलनगुडा जंगल परिसरात लपून बसलेला असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोस्टे गट्टा (जां.) पोस्ट पार्टी व केंद्रीय राखीव पोलीस बल ई -191 बटा. च्या जवानांनी विशेष अभियान राबवून ताब्यात घेऊन अटक केली.