कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

बँकाकडून पीककर्जमिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खटाटोप करावा लागतो. त्यातच सिबिल स्कोअर कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना बँका कर्ज नाकारतात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

वनिता कांबळे | Updated: May 13, 2023, 05:49 PM IST
कर्जासाठी  शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश title=

Farmer CIBIL Score : शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर करणारा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. बँकांकडून कर्ज घेणाऱ्यांना बँकेला सिबिल स्कोअर सादर करावा लागतो. शेतकऱ्यांना देखील या प्रक्रियेतून जावे लागते.  सिबिल स्कोअर खराब असल्याने अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. मात्र, आता शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागणार नाही. कर्जासाठी  शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा असे आदेशच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी दिले आहेत.   

2023 च्या खरिप हंगाम करिता शनिवारी अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे यानुषंगाने काही सूचना देखील त्यांनी दिल्या.

कोणतीही बँक जर शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागत असल्यास त्या बॅंकेवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिल आहेत. तर, सिबिल स्कोअर कमी असलेल्या शेतकऱ्यांना बँक जर पीक कर्ज नाकारत असेल तर त्या बँकांवर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

यावेळी HTBT बियाण्याची गुजरात मधून महाराष्ट्रात एन्ट्री बंद करण्याची मागणी भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी केली. या विषयी आपण लवकरच आदेश पारित करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी दिले.
यंदा पाऊस 80 टक्के गृहीत धरून जलयुक्त शिवारची कामे जलदगतीने करण्याच्या सूचना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. तर, दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली नाही पाहिजे याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी असेही निर्देशही त्यांनी दिले.

पंतप्रधान स्वनिधी महोत्सव, डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन

कोरोना काळात फुटपाथ विक्रेत्यांना आधार व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 2941 लाभार्थी पात्र ठरले असून यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी स्वनिधी महोत्सवाचे आयोजन आज लक्ष्मी सभागृह भंडारा येथे करण्यात आले आहे.

फुटपाथ विक्रेतांना कोरोना काळात आधार व्हावा आणि व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीने सहज निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा शुभारंभ केला. यात सुरुवातीला 10 हजार रुपयांचा निधीतून तो प्रामाणिकपणे भरला गेल्यास दुसऱ्या टप्प्यात 20 हजार आणि तिसऱ्या टप्प्यात 50 हजाराची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी अनेक प्रयत्न केले. त्याचाच परिणाम भंडारा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 3833 लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर केले. त्यापैकी 2941 लाभार्थ्याचे अर्ज मंजूर होऊन ते पात्र ठरले. 3 कोटी 54 लाखाचा निधी देण्यात आला आहे. याच लाभार्थ्यांपैकी उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीचा अवलंब करणाऱ्या काही लाभार्थ्यांचा स्वनिधी महोत्सवात डॉ. कराड यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.