दोन आठवड्यांपासून 8 वर्षीय पोटच्या मुलीवर बापाकडून रेप; आईने दाखल केली तक्रार

राज्याच्या उपराजधानीत नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 

Updated: Sep 26, 2021, 12:00 PM IST
दोन आठवड्यांपासून 8 वर्षीय पोटच्या मुलीवर बापाकडून रेप; आईने दाखल केली तक्रार title=
representative image

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका कलयुगी बापाने आपल्या 8 वर्षाच्या मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले आहे. आरोपी काही दिवसांपासून आपल्या मुलीशी सबंध ठेवत होता.

नराधम आरोपीचा किस्सा येथेच थांबत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार परिसरातील मुलांवरही त्याची वाईट नजर असते. आरोपीने आपला अल्पवयीन भाच्यालाही आपल्या वासनेचा शिकार केले होते. त्याच्यासोबतही तो अनेक दिवसांपासून अनैसर्गिक संबध ठेवत होता.

नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय व्यक्तीला आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि 7 वर्षीय भाच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी गेल्या 2 आठवड्यांपासून पोटच्या मुलीवर लैगिंक अत्याचार करीत होता.

इंडिया डॉट.कॉमने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पत्नीने आपल्या पतीच्या नराधरमी कृत्यांना वैतागून कधीच सोडले होते. त्या दरम्यान तिचा पती किन्नर बनून रस्त्याने भिख मागत होता.

पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर आरोपीवर पोक्सो अतर्गंत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.