अमरावती : राज्यातील कोरोना संसर्ग अद्याप कमी झालेला नाही. राज्यभर कडक निर्बंध संचारबंदी असूनही कोरोना संसर्ग अपेक्षेप्रमाणे आटोक्यात आलेला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात रविवारपासून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता. प्रशासनाने आणखी कडक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात रविवारी दुपारी 12 वाजेपासून ते 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या सूचनेनुसार भाजीपालसह किराणा दुकानेही बंद राहणार आहेत. फक्त ऑनलाईन सुविधा सुरू राहणार आहेत. हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू राहतील.
कडक लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर दंड आणि वाहने जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि जिल्हापरिषदेचे कार्यालय सुरू राहणार आहे. त्याव्यतिरिक्त प्रशासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.